आईने नाही जणू कसाईच, 'हा' Video पाहून तुम्हीही हेच म्हणाल; 4 वर्षाच्या चिमुकलीसोबत...
ठाणे शहरातील दिवा परिसरात एका आईने आपल्या साडे चार वर्षाच्या मुलीला स्टीलच्या रॉडने वार करत गंभीर मारहाण केल्याचं वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

4 वर्षांच्या मुलीला आईकडून गंभीर मारहाण

क्षुल्लक कारणावरून आईने मुलीवर स्टीलच्या रॉडने वार...

ठाण्यातील हृदयद्रावक घटना
Thane Crime: महाराष्ट्रातील ठाणे शहरातून एक हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आलं आहे. आपल्या मुलाला थोडी जखम जरी झाली तरी त्याच्या वेदना आईला होतात, असं म्हटलं जातं. ठाणे शहरातील दिवा परिसरात एका आईने आपल्या साडे चार वर्षाच्या मुलीला अगदी गंभीर पद्धतीने मारहाण केली. फक्त मुलगी जेवत नसल्यामुळे आईकडूनच तिला इतक्या वाईट प्रकारे मारहाण करण्यात आली. त्या आईने आपल्या निरागस मुलीला फक्त मारलंच नाही तर स्टीलच्या रॉडने वार केले. दिवा शहरातील साबेगाव परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे.
मोठ्या मुलीने बनवला व्हिडीओ
आईकडून लहान मुलीला मारहाण होत असताना महिलेच्या मोठ्या मुलीने आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ बनवला. आई मुलीला स्टीलच्या रॉडने मारत असल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. इतकेच नव्हे तर त्यावेळी ती महिला आपल्या मुलीच्या नितंबावर सुद्धा पाय ठेवताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर येताच घटनेचं गांभीर्य आणखी वाढत असल्याचं समोर येत आहे.
हे ही वाचा: आई नाही ही कैदासीन, दीड महिन्याच्या पोटच्या लेकराला उकळत्या पाण्यात टाकलं, नेमकं 'त्या' रात्री काय घडलं?
घटनास्थळी पोहचताच पोलिसांची कारवाई
दिवा पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच ते थेट घटनास्थळी पोहचले. त्यानंतर आरोपी महिलेला मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. या प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव यशोदा ब्रह्मया गोदीमेटाले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर आरोपीचा जबाब नोंदवण्यात आला. पीडित मुलीच्या आजीनेच आपल्या सूनेविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.
हे ही वाचा: 'मराठीचा माज नाही, गद्दारीची लाज नाही', वैभव जोशींच्या कवितेचं विडंबन... ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंना डिवचलं!
मुलीला सुरक्षित ठिकाणी...
पोलिसांनी आरोपी यशोदाविरुद्ध अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 115 (2), 118 (1) आणि 75( मुलांच्या हक्कांच्या संरक्षणाशी संबंधित) यांचा समावेश आहे. आरोपीला महिलेला नोटिस देण्यात आली असून प्रकरणासंदर्भात पुढील तपास केला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच, पीडित मुलीला आता उल्हासनगर मधील महिला आणि बाल कल्याण समितीच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, जेणेकरून ती सुरक्षित राहील आणि तिच्यासोबत अशी घटना पुन्हा घडू नये.