तुमच्याही काळाजाचा थरकाप उडेल.. दीड महिन्याचा मुलाला आईने उकळत्या पाण्यात उकळून काढलं!

मुंबई तक

Crime News : बंगळुरूतील नेलमंगला येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवलेल्या आईने एका लहान बाळाला दीड महिन्यानंतर गरम उकळत्या पाण्यात बुडवले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवलेल्या आईनंच मुलाचा घेतला बळी

point

कारण ऐकून थक्क व्हाल

Crime News : बंगळुरूतील नेलमंगला येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवलेल्या एका लहान बाळाला दीड महिन्यानंतर गरम उकळत्या पाण्यात बुडवले. त्यातच त्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. एक आई आपल्या पोटच्या लेकरासोबत असं कसं कृत्य करू शकते? असा तुम्हाला प्रश्न पडला असेलच. पण हे खरंच असून थरकाप उडवणारं वास्तव आता समोर आलं आहे. 

हेही वाचा : घरातून बाहेर पडताय..जरा जपून! मुंबईत 'या' ठिकाणी पाऊस घालणार धुमाकूळ, आजचं हवामान वाचून धडकीच भरेल

नेमकं काय घडलं? 

आईचं आणि मुलांच्या नात्याएवढं कोणतंच भारी नातं या जगात नाही. मात्र, एका आईनेच आपल्या पोटच्या अवघ्या दीड महिन्याच्या लेकराचा उकळत्या पाण्यात टाकून जीव घेतला. ही घटना बंगळुरूजवळीस नेलामंगला तालुक्यातील विशिशापुरा गावातील आहे. क्रूर आईचं नाव राधे असे असून तिनं केलेलं कृत्य हे रक्षसी आहे. पण राधेनं असं पाऊल उचलण्यामागचं कारण समोर आलेलं आहे. 

आईच्या क्रूर कृत्याचं कारण आलं समोर 

राधे आणि तिचा नवरा पवन यांना नुकतंच गोंडस बाळ जन्माला आलं. पण पवनला दारूचं व्यसन होतं. घरी आर्थिक संकट होते आणि राधे किंवा मुलाची काळजी घेऊ शकत नव्हता. या परिस्थितीमुळे राधे खचली होती. त्या परिस्थितीशी सामना करत असताना तिनं भयानक पाऊल उचललं. जे करायला नको होतं तेच केलं आहे. ही घटना रात्री उशीरा घडली असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वजण झोपले असताना राधेनं शांतपणे आपल्या मुलीला मांडीवर घेतले आणि उकळत्या पाण्यात टाकले. काही क्षणांतच निष्पाप चिमुरड्याचा जीव गेला. ही माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा : ज्योतिषशास्त्रात तब्बल 12 वर्षानंतर आला दुर्मिळ योग, 'या' राशीतील लोकांचं नशीब चमकलं

या प्रकरणाची चौकशी सुरु असून नेलंमंगला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, ते सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp