दोन पती, दीर आणि सासऱ्यासोबतही अनैतिक संबंध ठेवणारी पूजा.. आता भाऊ आणि वहिनीलाही आलं टेन्शनं!

मुंबई तक

मध्य प्रदेशातील ग्वालियरमधील आपल्या सासूची हत्या करणाऱ्या पूजाचे बरीच अनैतिक संबंधांची प्रकरणं समोर आली आहेत. आता पूजा जाटवच्या प्रकरणातील नवीन ट्विस्ट समोर आला आहे. पूजाचे दादा आणि वहिनी तिला घाबरत असल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

दोन पती, दिरापासून मुलगी अन् सासऱ्यांसोबत संबंध ठेवणाऱ्या पूजाची दादा-वहिनीला भिती!
दोन पती, दिरापासून मुलगी अन् सासऱ्यांसोबत संबंध ठेवणाऱ्या पूजाची दादा-वहिनीला भिती!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पूजा जाटवच्या प्रकरणासंदर्भात नवी माहिती

point

अनैतिक संबंध आणि सासूची हत्या करणाऱ्या पूजाची दादा वहिनीला भीती!

point

पूजाच्या दादा आणि वहिनीने नेमकं काय सांगितलं?

Pooja Jatav New Update: मध्य प्रदेशातील ग्वालियरमधील आपल्या सासूची हत्या करणाऱ्या पूजाचे बरीच अनैतिक संबंधांची प्रकरणं समोर आली आहेत. पूजाचे एक नव्हे तर दोन पती राहिले आहेत. याव्यतिरिक्त तिने आपल्या सासऱ्यांसोबत देखील शारीरिक संबंध ठेवले होते. आपल्या दिरासोबत असलेल्या संबंधांमधून तिला एक मुलगी झाल्याचा देखील दावा केला जात आहे. 

इतकेच नव्हे तर जमीन बळकावण्याच्या प्रयत्नात सासू आड येत असल्याकारणाने तिने प्रियकराच्या मदतीने सासूची हत्या केली. योग्य योजना आखून सासूची हत्या केल्याचा पूजावर आरोप आहे. आता पूजा जाटवच्या प्रकरणातील नवीन ट्विस्ट समोर आला आहे. पूजाचे दादा आणि वहिनी तिला घाबरत असल्याचं सांगितलं जात आहे. 

काय म्हणाले दादा-वहिनी? 

या हत्याकांडमध्ये पूजा आणि तिच्या बहिणीचं नाव समोर आल्यानंतर त्याच्या भावाची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. पूजाची भीती वाटत असल्याचं तिच्या भावाने सांगितलं. आरोपी पूजाचे दादा आणि वहिनी म्हणाले, "आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत ती अशी वागली आणि त्यांची हत्या केली, तर आमच्यासोबत देखील ती असं का नाही करणार? तिने गुन्हा केला आहे आणि तिला शिक्षा झालीच पाहिजे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आम्ही तिला कधीही स्वीकारणार नाही. तिने तिच्या आजारी वडिलांना सोडले. यानंतर आम्ही तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत."

यापूर्वी सुद्धा तरुंगात गेली...

मध्य प्रदेशातील ओरछा गावाचा रहिवासी असलेल्या रमेशसोबत पूजाचं पहिलं लग्न झालं होतं. सुरुवातील सगळं ठिक चालू असताना नंतर त्यांच्यातील वाद वाढू लागले आणि एके दिवशी तिने आपल्या पतीवर गोळी झाडली. यातून रमेशचा जीव वाचला असला तरी पूजाला तरुंगात जावं लागलं. शस्त्रास्त्र कायद्याच्या खटल्यात हजेरी लावताना उत्तर प्रदेशातील झाशीच्या तहरौली पोलीस स्टेशन परिसरातील कुम्हरिया गावाचा रहिवासी लखन उर्फ ​​कल्याणशी पूजाची भेट झाली. कल्याणवर अनेक गुन्हेगारी गुन्हे दाखल होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp