सचिन वाझेंकडून अँटेलिया बाहेर रेकी?? NIA च्या अधिकाऱ्यांना संशय
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात NIA ने मुंबई पोलीस दलात काम करणारे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. यानंतरच्या तपासातून अनेक महत्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. सचिन वाझे यांनी अंबानी यांच्या अँटेलिया घराबाहेर स्कॉर्पिओ गाडी ठेवल्याची माहिती NIA मधील सूत्रांनी दिली. ही गाडी ठेवण्याआधी सचिन वाझे यांनी रेकी केल्याचंही आता समोर येतंय. […]
ADVERTISEMENT
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात NIA ने मुंबई पोलीस दलात काम करणारे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. यानंतरच्या तपासातून अनेक महत्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. सचिन वाझे यांनी अंबानी यांच्या अँटेलिया घराबाहेर स्कॉर्पिओ गाडी ठेवल्याची माहिती NIA मधील सूत्रांनी दिली. ही गाडी ठेवण्याआधी सचिन वाझे यांनी रेकी केल्याचंही आता समोर येतंय.
ADVERTISEMENT
मुंबई पोलिसांमधील नाराजी चव्हाट्यावर ! उद्धव ठाकरेंवर नाराज असलेले संजय पांडे सुट्टीवर
NIA मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांना अंबानी यांच्या घराबाहेरील BMC च्या पार्किंग स्पेसमध्ये ही कार पार्क करायची होती. ही गाडी पार्क करण्यासाठी वाझे आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्याने या भागाची रेकीही केल्याचा NIA ला संशय आहे. सचिन वाझे या पार्किंग स्पेसमध्ये गेले आणि १५ मिनीटांसाठी त्यांनी ही गाडी पार्क केली. पार्किंगचे पैसेही न देता सचिन वाझे आणि त्यांचे सहकारी तिकडून बाहेर पडले. पण वाझे यांनी यानंतरही ही कार त्याच भागात पार्क का करुन ठेवली नाही याचा तपास आता NIA करत आहे. पार्कींग लॉटचं सीसीटीव्ही फुटेजही NIA चे अधिकारी तपासत आहेत.
हे वाचलं का?
दरम्यान या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील आणखी काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चौकशीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले जाणार नसून त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेण्याचा NIA प्रयत्न करणार आहे. सचिन वाझे हे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिटमध्ये CIU विभागात काम करत होते. नियमानुसार वाझे यांनी DCP किंवा Joint CP (Crime) यांना रिपोर्टींग करणं गरजेचं होतं. पण सचिन वाझे हे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना रिपोर्ट करायचे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या कामाची शैली कशी होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न NIA करणार आहे.
दरम्यान, परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर, महाविकास आघाडी सरकारने हेमंत नगराळे यांच्याकडे मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार सोपवला आहे. सचिन वाझे प्रकरणाच चर्चेत आलेल्या परमबीर सिंग यांची होमगार्ड विभागात बदली करण्यात आली आहे. परंतू या प्रकरणात राज्य सरकारसमोरच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असलेले IPS अधिकारी संजय पांडे सुट्टीवर गेले आहेत. परमबीर सिंग यांच्याआधी संजय पांडे यांच्याकडे होमगार्ड विभागाच्या DG पदाचा पदभार होता. नवीन बदल्यांमध्ये पांडे यांना Maharashtra State Security Corporation विभागात हलवण्यात आलं. महत्वाच्या पदांसाठी आपला विचार केला जात नसल्यामुळे नाराज झालेल्या पांडे यांनी सुट्टीवर जाणं पसंत केलं आहे. संजय पांडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्यावर अन्याय होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT