समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच, बोगस दाखल्यावरून नोकरी मिळवली-नवाब मलिक
समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच आहेत. बोगस दाखला दाखवून समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवले. मी माझ्या दाव्यावर ठाम आहे की ते जन्माने मुस्लिम आहेत असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 2015 पासून या लोकांनी त्यांची ओळख लपवण्यास सुरूवात केली. फेसबुक पेजवर दाऊद वानखेडे असंच नाव होतं. नंतर ज्ञानदेव लिहिण्यास सुरूवात केली आहे. एवढंच नाही तर समीर […]
ADVERTISEMENT

समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच आहेत. बोगस दाखला दाखवून समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवले. मी माझ्या दाव्यावर ठाम आहे की ते जन्माने मुस्लिम आहेत असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 2015 पासून या लोकांनी त्यांची ओळख लपवण्यास सुरूवात केली. फेसबुक पेजवर दाऊद वानखेडे असंच नाव होतं. नंतर ज्ञानदेव लिहिण्यास सुरूवात केली आहे. एवढंच नाही तर समीर वानखेडे यांचे नातेवाईकच मुस्लिम आहेत असाही दावा नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला की समीर वानखेडेंचा मेव्हणा आहे. तो आता व्हेनिसला राहतो. तो त्यांचा नातेवाईक आहे. तो मुस्लिम आहे. काल राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी मीडियाशी संवाद साधताना एक विधान केलं. वानखेडेंनी धर्मांतर केलं नाही असं ते म्हणाले. मी पुन्हा सांगतो वानखेडे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांचे कुटुंब मुस्लिम होते, असं मलिक म्हणाले.
वानखेडेंनी बोगस दाखल्यावर नोकरी मिळवली आहे. वानखेडे कुटुंबाने 2015पासून आपली ओळख लपवली. फेसबूकवर दाऊद वानखेडे असं नाव होतं. त्यांनी ते बदलून डिके वानखेडे लिहिलं. नंतर ज्ञानदेव लिहिलं. मुस्लिम लोकांसमोर विषय गेला तर नोकरी धोक्यात येईल म्हणून नाव बदललं. यास्मिनचं जास्मीन केलं. दाऊदचा ज्ञानदेव झाला. जावई, सून सोबत राहिले तर अडचणीचं होऊ शकतं म्हणून त्यांनी घटस्फोट घेतला. मेव्हण्यालाही घटस्फोट दिला, असं त्यांनी सांगितलं.










