कृष्णा नदीत आयर्विन पुलावरून मारली उडी, सांगलीच्या तरूणाचा व्हीडिओ व्हायरल
कृष्णा नदीवर आयर्विन नावाच पूल आहे हा पूल ७० फूट उंच आहे. या पुलावरून एका तरूणाने उडी मारल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओची चांगलीच चर्चा आहे. कृष्णा नदीची पातळी वाढली की असे प्रकार घडतात. पोलिसांनी अटकाव केल्यावर ते थांबतात. यंदा कृष्णा नदीची पाणी पातळी 20 फूटापर्यंत आली आहे अशात आता […]
ADVERTISEMENT
कृष्णा नदीवर आयर्विन नावाच पूल आहे हा पूल ७० फूट उंच आहे. या पुलावरून एका तरूणाने उडी मारल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हीडिओची चांगलीच चर्चा आहे. कृष्णा नदीची पातळी वाढली की असे प्रकार घडतात. पोलिसांनी अटकाव केल्यावर ते थांबतात. यंदा कृष्णा नदीची पाणी पातळी 20 फूटापर्यंत आली आहे अशात आता यंदाही उंच पूलावरून उडी मारण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. पोलिसांनी यामध्ये तातडीने लक्ष घातलं पाहिजे अन्यथा दुर्घटना घडू शकते. सध्या या तरूणाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. तो व्हीडिओ देखील उरी या सिनेमाचे जोशपूर्ण असे म्युझिक लावून व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत असं आता स्थानिकांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
आयर्विन पूलावरून सांगलीचा हा तरूण उडी मारून स्टंटबाजी करताना या व्हीडिओमध्ये दिसतो आहे. हा एक प्रकारे स्वतःच्या जीवाशी खेळच आहे. सांगली, कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे. आयर्विन पुलावरून एका तरूणाचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर या ठिकाणी पोलीस पाठवले आहेत. सोशल मीडियावर मात्र या व्हीडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT