Shiv Sena vs BJP: शिवसैनिकांनी भाजपला प्रसाद दिला आहे, शिवभोजनाची वेळ येऊ देऊ नका: संजय राऊत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘शिवसेना (Shiv Sena) भवनासमोर भाजपचे (BJP) काही लोक राडा घालण्याचा प्रयत्न करत होते. शिवसैनिकांनी प्रसाद दिला आहे. हा विषय शिवप्रसादापर्यंतच राहू दे शिवभोजन थाळी देण्याची वेळी येऊ देऊ नका.’ अशी प्रतिक्रिया देत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला एक प्रकारे इशाराच दिला आहे.

ADVERTISEMENT

राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल (16 जून) शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. ज्याला रोखण्यासाठी शिवसैनिक देखील रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे शिवसेना भवन परिसरात बराच गदारोळ झाला. याबाबत आज (17 जून) संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले:

हे वाचलं का?

‘हुतात्मा चौक जसं आपल्या अस्मितेचं प्रतिक आहे तसंच शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहे. तुमचे राजकीय मतभेद असू शकतात. पण तसंच शिवसेना भवन मराठी माणसाच्या अस्मितेचं भवन आहे. ती बाळासाहेब ठाकरेंची वास्तू आहे.’

‘शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचं काय कारण आहे? तुम्हाला लिहिता वाचता येतं का? तुम्ही सामनाचा अग्रलेख नीट वाचा. जे आरोप झाले ते नीट वाचा. आमचे प्रवक्ते काय म्हणाले ते देखील नीट ऐका. जे आरोप झाले आहेत, त्याची चौकशी करावी. ते आरोप द्वेष बुद्धीने केलेले असतील तर आरोप करणाऱ्यांना सोडू नका. त्यांच्यावर कारवाई करा.’

ADVERTISEMENT

‘भाजपवर कुठेच थेट आरोप केलेला नाही. हा घोटाळा भाजपने केला असं म्हटलं नाही. राम मंदिरासाठीची ट्रस्ट स्वायत्त आहे. त्यातील सदस्य कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. तरीही तुम्ही टीका करता, ट्रस्टमध्ये काय भाजपची माणसं आहेत का?’

ADVERTISEMENT

‘ट्रस्टला जर काही प्रश्न विचारले तर त्यांनी त्याचा खुलासा करू नये का? काल हल्ला करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. मला वाटतं हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहिला पाहिजे. त्यांनी शिवभोजन देण्याची वेळ आणू नका.’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

राम मंदिर जमीन घोटाळा : हिंदूंच्या श्रद्धेला ठेच पोहचली, सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावं – संजय राऊत

नेमकं प्रकरण काय?

अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास (ट्रस्ट) जमीन खरेदी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. यावर शिवसेनेने टीका केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी असं म्हटलं होतं की सरसंघचालक मोहन भागवत यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावं. तसंच सामनातून अग्रलेख लिहूनही या प्रकरणी टीका करण्यात आली होती. यावरूनच भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले होते.

शिवसेनेनी प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या जागेच्या व्यवहाराबाबत जे आरोप झाले त्यावर टीका केली त्यामुळे भाजयुमो तर्फे म्हणजेच भारतीय युवा मोर्चातर्फे शिवसेना भवनाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं.

यावेळी शिवसेना भवनाच्या बाहेर भाजयुमोचं आंदोनल सुरू आहे हे समजताच शिवसेना कार्यकर्तेही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आणि मग दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहण्यास मिळालं.

शिवसेना भवनासमोर Shivsena आणि BJP कार्यकर्त्यांचा राडा

अयोध्या जमीन गैरव्यहार प्रकरण काय आहे?

लखनऊ ‘आप’चे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन ट्रस्टने जमीन खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला.

दोन कोटींची जमीन अवघ्या पाच मिनिटांत 18.5 कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्याची मागणी संजय सिंह यांनी केली.

दरम्यान ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी निवेदन प्रसिद्ध करत आरोप फेटाळले आहेत. मागील 100 वर्ष आमच्या वर कुठले ना कुठले आरोप झाले आहेत.

महात्मा गांधी यांची हत्या केल्याचाही आरोप आमच्यावर केला गेला. अशा कोणत्याही आरोपांची आम्ही पर्वा करत नाही. या नव्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याची शहानिशा करून प्रत्युत्तर दिले जाईल,’’ असे चंपत राय यांनी पत्रकारांना सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT