मिरच्या झोंबल्या म्हणूनच खुलासा करावा लागला; संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली. फडणवीसांकडून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी काही प्रश्न उपस्थित करत पलटवार केला. ‘उद्धव ठाकरेंच्या भाषणात बोलायला काही नव्हतं, तर तुम्ही एवढी मोठी पत्रकार परिषद घेऊन वेळ का खाताय? दखल का घेता आहात?’, असा सवाल राऊत यांनी फडणवीसांना केला. […]
ADVERTISEMENT
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली. फडणवीसांकडून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी काही प्रश्न उपस्थित करत पलटवार केला. ‘उद्धव ठाकरेंच्या भाषणात बोलायला काही नव्हतं, तर तुम्ही एवढी मोठी पत्रकार परिषद घेऊन वेळ का खाताय? दखल का घेता आहात?’, असा सवाल राऊत यांनी फडणवीसांना केला.
ADVERTISEMENT
शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या शहरांच्या नामांतराच्या प्रश्नाबद्दल विचारण्यात आलं. राऊत म्हणाले, ‘आपण पाच वर्ष मुख्यमंत्री होतात. तेव्हा औरंगजेबाला कवटाळून बसला होतात का? हिंदुत्ववादी म्हणून मुख्यमंत्री होतात ना. एखाद्या शहराचं नाव बदलायचं असेल, तर केंद्राची परवानगी लागते. गेल्या काही वर्षांपासून सरकार केंद्राकडे प्रयत्न करत आहे. केंद्राने परवानगी का दिली, हे विचारावं लागेल. आपण पाच वर्ष मुख्यमंत्री असताना आपल्याला असं का वाटलं नाही. जसं योगींनी प्रयागराज करून घेतलं, तसं फडणवीसांनी औरंगाबादचं संभाजीनगर का केलं नाही?’, असा उलट सवाल राऊतांनी उपस्थित केला.
‘हल्ली ते गोव्यात असतात. त्यामुळे त्यांच्या डोक्यात गोव्याचं सरकार असावं. इतकं बेशिस्त आणि भ्रष्ट सरकार गोव्यात आहेत. सत्यपाल मलिक गोव्याचे राज्यपाल असताना म्हणाले होते. अनेक माफिया, भूमाफिया, दलाल हे भाजपचे उमेदवार आहेत. त्याविरोधात मनोहर पर्रिकर यांच्या कुटुंबातूनच बंड झालं आहे. देवेंद्रजी गोव्यात असल्यामुळे त्यांच्या डोक्यात गोव्यातील सरकार असेल,’ असा टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला.
हे वाचलं का?
राम मंदिराच्या बदल्यात सरन्यायाधीशांना खासदार केलं गेलं; संजय राऊतांचं खळबळजनक विधान
‘१९९२ साली बाबरीच्या पतनानंतर जो दंगा उसळला होता, ती या देशातील हिंदुत्वाची सगळ्यात मोठी लढाई होती. ती लढाई लढताना हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शेकडो शिवसैनिकांनी बलिदान दिलं. आम्ही सगळे वर्षानुवर्षे न्यायालयात उभे राहिलो. तेव्हा आपण सगळे कुठे होतात? असा प्रश्न विचारला तर त्यांच्याकडे उत्तर आहे का?’, असा प्रश्न राऊत यांनी फडणवीसांना केला आहे.
ADVERTISEMENT
उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त होण्यावरून राऊत म्हणाले, ‘कशाला इतिहास चिवडत बसताय? मागच्या ४० वर्षात अनेक राज्यात तुमचे किती झिपॉझिट किती जप्त झाले? हा इतिहास काढत बसलो, तर महाग पडेल. उत्तर प्रदेशचा विषय बाजूला ठेवा, गोव्यात लक्ष द्या,’ असा सल्लाही राऊतांनी फडणवीसांना दिला.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरेंकडे बोलायला काही नव्हतं, अशी टीका भाजपकडून करण्यात आली. त्यालाही राऊतांनी उत्तर दिलं. ‘बोलायला काही नव्हतं, तर तुम्ही का बोलत आहात? उद्धव ठाकरेंच्या भाषणात बोलायला काही नव्हतं, तर तुम्ही एवढी मोठी पत्रकार परिषद घेऊन वेळ का खाताय? दखल का घेता आहात? तुम्हाला दखल घ्यावी लागली. तुम्हाला मिर्च्या झोंबल्या. ठसका लागला. सगळं काही लागल्यामुळेच तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या भाषणावर पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा लागतोय. त्याचाच अर्थ असा की उद्धव ठाकरेंचं कालच भाषण सुपरहिट झालेलं आहे’, असा पलटवार राऊतांनी भाजपवर केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT