Satara: विद्यार्थिंनींना दाखवायचा पॉर्न, वासनांध शिक्षकाला घडली अद्दल!
Satara police arrested a teacher: सातारा: कोल्हापूरमधील (Kolhapur) शेळेवाडी (ता. राधानगरी) येथील माध्यमिक शाळेतील मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन अश्लील वर्तन करणाऱ्या विजयकुमार परशुराम बागडी (वय 52) या शिक्षकाविरूद्ध (Teacher) मुख्याध्यापक प्रभाकर कोले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर दोन तासातच उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांनी या शिक्षकाला अटक केली. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ […]
ADVERTISEMENT
Satara police arrested a teacher: सातारा: कोल्हापूरमधील (Kolhapur) शेळेवाडी (ता. राधानगरी) येथील माध्यमिक शाळेतील मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन अश्लील वर्तन करणाऱ्या विजयकुमार परशुराम बागडी (वय 52) या शिक्षकाविरूद्ध (Teacher) मुख्याध्यापक प्रभाकर कोले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यानंतर दोन तासातच उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांनी या शिक्षकाला अटक केली. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. (Satara police arrested a teacher who engaged in obscenity with students in school)
ADVERTISEMENT
याबाबतची माहिती अशी की, शेळेवाडी येथील माध्यमिक शाळेतील पंधरा ते सोळा वयोगटातील सात मुलींसोबत महिनाभरापूर्वी विजयकुमार बागडी या शिक्षकाने चुकीचे वर्तन केले होते. या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी संबधित संस्थेकडे तक्रार केली होती. यावरून संबंधित शिक्षक बागडीची बदली साताऱ्यात (Satara) करण्यात आली होती.
त्यानंतर समुपदेशन करण्यासाठी गेलेल्या गीता हसूरकर यांना पीडित मुलींनी घडलेल्या प्रकाराची माहीती दिली. मुलींच्या धाडसी वृतीमुळे या प्रकरणाला वाचा फुटली. मुख्याध्यापक प्रभाकर कोले यांनी आज (मंगळवार) सकाळी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये रितसर तक्रार दिली. यानंतर शिक्षक बागडीस अटक करण्यात आली.
हे वाचलं का?
शिक्षकी पेशाला काळीमा ! अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक
नेमकं प्रकरण काय?
विजयकुमार बागडी या शिक्षकाने काही मुलींना पॉर्न व्हिडिओ दाखवून त्यांच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.
ADVERTISEMENT
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी गावात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शाळेत इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाने नववी आणि दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत मुलींसोबत गैर कृत्य केलं होतं. यावेळी संबंधित शिक्षकाने पुन्हा मुलींना धमकी देण्याचे प्रकारही केला.
ADVERTISEMENT
अश्लील कृत्य करणाऱ्या शिक्षकाला अटक, पॉस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल
संबंधित शिक्षक हा शाळेतील नववी-दहावीत शिकणाऱ्या वीस ते पंचवीस मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांच्या खांद्यावर हात ठेवणं, अश्लील चाळे करणं असे प्रकार करत असल्याचं विद्यार्थिंनींनी आपल्या पालकांना सांगितलं. ज्यानंतर ही सगळी घटना उघडकीस आली.
हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर विजयकुमार बागडीची सातारा जिल्ह्यात बदली करुन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न शिक्षण संस्थेकडून करण्यात आला. मात्र, सातारा जिल्ह्यात जेव्हा अशा शिक्षकाची बदली झाली आहे ही बातमी कळताच सातारा जिल्ह्यातून या घटनेची तीव्र पडसाद उमटू लागले. त्यानंतर शिक्षण विभागातून अश्लील गुरुजी नको ग बाई असा सूर उमटू लागला होता. मात्र आता आरोपी शिक्षकाला अटक केल्याने अनेक विद्यार्थिनी आणि पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT