कोश्यारीच्या राजीनाम्यानंतर शरद पवार म्हणाले, ‘चौकशी व्हायला हवी’

मुंबई तक

Sharad Pawar Reaction on bhagat Singh koshyari : गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त विधानं आणि भूमिकांमुळे विरोधी पक्ष आणि विविध संघटनांच्या रडारवर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पूर्ण केली. राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्याची मागणी त्यांनी मोदींकडे केली होती. त्यानंतर त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sharad Pawar Reaction on bhagat Singh koshyari : गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त विधानं आणि भूमिकांमुळे विरोधी पक्ष आणि विविध संघटनांच्या रडारवर आलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पूर्ण केली. राज्यपाल पदावरून पदमुक्त करण्याची मागणी त्यांनी मोदींकडे केली होती. त्यानंतर त्यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं.

भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राच्या राज्यपालपदी विराजमान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने चर्चेत राहिले ते महाविकास आघाडी सरकारच्या काळात. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारसोबतचा त्यांचा संघर्ष सातत्यानं दिसून आला.

विधान परिषदेतील 12 जागांच्या नियुक्त्या असो की, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना आदेश देणे, अशा विविध कारणांमुळे महाविकास आघाडीकडून त्यांच्यावर समांतर सरकार चालवण्याचा आरोपही झाला. गेल्या काही महिन्यात त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांवरुन तीव्र पडसाद उमटले आणि कोश्यारींना अखेर पदमुक्त करण्यात आले.

Ramesh Bais: नगरसेवक ते महाराष्ट्राचे राज्यपाल, कोण आहेत रमेश बैस?

हे वाचलं का?

    follow whatsapp