पुणे : किराणा मालाच्या दुकानात दारुविक्री, पोलिसांनी मालकाला ठोकल्या बेड्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी राज्यात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक सेवेत येणारे किराणा माल, मेडीकल आणि दूध विकणाऱ्या दुकानदारांना आपली दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र याचा गैरफायदा घेत पुणे ग्रामीण भागातील शिरुर भागातील करंदी या गावात किराणा मालाच्या दुकानात देशी दारुची विक्री करायला सुरुवात केली.

ADVERTISEMENT

करंदी गावातील किराणा मालाच्या दुकानात देशी दारुची विक्री होत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर कारवाई करत या दुकानावर छापा मारला. या कारवाईत पोलिसांना देशी-विदेशी दारुच्या तब्बल १३५ बॉटल आढळून आल्या. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून दुकानदार आरोपी संदीप खेडकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT