Shiv sena : पक्ष गमावला, आता उद्धव ठाकरेंच्या हातात काय राहणार?

ऋत्विक भालेकर

Shiv sena |Bow and Arrow Symbol : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाला ‘शिवसेना’ (Shiv sena) म्हणून निवडणूक आयोगाने (Election Commission) मान्यता दिली आहे. त्यामुळे ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह या गोष्टी आता शिंदे गटाला मिळाल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. अशात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Shiv sena |Bow and Arrow Symbol :

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाला ‘शिवसेना’ (Shiv sena) म्हणून निवडणूक आयोगाने (Election Commission) मान्यता दिली आहे. त्यामुळे ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह या गोष्टी आता शिंदे गटाला मिळाल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. अशात आता पक्ष आणि नाव गमाविल्यानंतर पक्षाच्या शाखा, पक्षाचा निधी, पक्षाचे प्रमुख कार्यालय असलेले शिवसेना भवन, पक्षाचे मुखपत्र ‘सामना’ वृत्तपत्र यांचे काय होणार? असाही सवाल विचारला जात आहे. (Shiv sena : After losing the party, what will be left in Uddhav Thackeray’s hands?)

‘शिवसेना भवन’ हे यापूर्वी शिवसेना पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय होते. मात्र हे शिवसेना भवन आता पक्षाच्या मालकीचे नसून शिवाई ट्रस्टच्या मालकीची मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष ठाकरेंचे विश्वासू नेते लीलाधर डाके आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदिप देशपांडे यांनी ट्विट केलेल्या मुंबई शहराच्या सर्व्हे रजिस्टरच्या दस्तऐवजानुसार, या ट्रस्टवर दिवाकर रावते, खासदार सुभाष देसाई, अरविंद सावंत आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचाही समावेश आहे. यातील कोणीही शिंदेसोबत गेलेलं नाही.

Maharashtra Political Crisis: बंडखोरी ते सेनेचा ताबा, शिंदेंनी कशी केली मात?

हे वाचलं का?

    follow whatsapp