‘शिवशक्ती-भीमशक्ती-लहुशक्ती’चा मुख्यमंत्री करायचा आहे : उद्धव ठाकरेंचे नवे सहकारी ठरले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहुशक्ती ही एकाच शक्तीची विविध रूप आहेत. या तिन्ही शक्ती आणि जोडीला आणखी जे येतील ते सर्व एकवटले तर किती प्रचंड मोठी ताकद केवळ या महाराष्ट्रात नाही तर देशात होईल. अशा या शिवशक्ती-भीमशक्ती आणि लहुशक्तीचा मुख्यमंत्री करायचा आहे, असं म्हणतं आगामी काळात शिवसेना (ठाकरे गट), वंचित बहुजन आघाडी आणि मातंग एकता दल यांची आघाडी होणार असल्याचे संकेत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे आज वांद्रे येथे मुंबई मातंग समाज आयोजित आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंती महोत्सव सोहळ्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री अनिल परब आणि मातंग एकता दलाचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे यांचीही उपस्थिती होती.

त्यामुळे मातंग समाज दुर्लक्षित राहिला :

उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईमध्ये मातंग समाजाची संख्या अडीच तीन लाख आहे. संख्या किती महत्त्वाची हे निवडणुकीच्या वेळेला कळते. पण काय मागितलं तुम्ही आजपर्यंत? काय मागण्या आहेत तुमच्या? आजपर्यंत हा समाज दुर्लक्षित राहिला. अगदी मी मुख्यमंत्री असतानाही. याचं कारण मी हा समाज वेगळा कधीच मानला नाही. कायम हा समाजही आपलाच आहे असं मी मानत आलो आहे. त्यामुळे त्या आपलेपणात मातंग समाजाच्या म्हणून काही मागण्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष झालं.

हे वाचलं का?

शिवशक्ती-भीमशक्ती-लहुशक्तीचा मुख्यमंत्री बसवायचा आहे.

शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहुशक्ती ही एकाच शक्तीची विविध रूप आहेत. या तिन्ही शक्ती आणि जोडीला आणखी जे येतील ते सर्व एकवटले तर किती प्रचंड मोठी ताकद केवळ या महाराष्ट्रात नाही तर देशात होईल. तुम्ही सांगितलं मला पुन्हा मुख्यमंत्री करायचा आहे. मला नाही, पण आपल्या सर्वांच्या हक्काचा, शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहुशक्ती यांचा एक कर्तबगार माणूस मग महिला असो वो पुरुष आपल्याला मुख्यमंत्रीपदी बसवायचा आहे.

आता हे स्वप्न केवळ स्वप्न न राहता सत्यात उतरवायचं असेल तर तुम्हाला सोबत येऊन वाड्या-वस्त्यांमध्ये जाऊन विचारांची ही मशाल पोहचवावी लागेल. अन्याय आणि अंधःकार दूर करणारी मशाल तुम्हाला घेऊन जावी लागेल. महाराष्ट्राच रक्षण करण्यासाठी आपण आता हातात हात घालून पुढे जाऊया, सोबत रहा. जे जे काही देता येईल ते आपण मिळून जनतेला दिलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

ADVERTISEMENT

मुंबईत आजपर्यंत अण्णाभाऊंचा एकही पुतळा नाही :

मुंबई आपली राजधानी आहे. लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे यांचा आपण जयजयकार करतो. अण्णाभाऊ संयुक्त महाराष्ट्रासाठी संघर्ष केला. त्यांनी आपल्याला मुंबई मिळवून दिली. पण त्या मुंबईत आजपर्यंत अण्णाभाऊंचा एकही पुतळा नाही ही आपल्यासाठी लाजेची गोष्ट आहे, असं म्हणतं अण्णाभाऊंनी मिळवून दिलेली मुंबई आपल्या ताब्यात ठेवायची आहे, असाही निर्धार यावेळी ठाकरे यांनी व्यक्त केला.

ADVERTISEMENT

अण्णाभाऊ साठे यांना अजून भारतरत्न दिला जात नाही :

तसंच अण्णाभाऊ साठे यांना अजून भारतरत्न दिला जात नसल्याची खंत यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. आज जे बसले आहेत द्यायाला त्यांना अण्णाभाऊ साठेंचं महत्व समजणार आहे? आणि समजलं तरी ते मानणार आहेत? त्यांना तर छत्रपती शिवाजी महाराजही आता जुने आदर्श वाटायला लागले आहेत. असाही टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT