सातारा : ‘निवडणूक आल्यानेच दिल्लीत नौटंकी’; शिवेंद्रसिंहराजेंचं उदयनराजेंवर शरसंधान
कास धरणाच्या उंची वाढवण्यावरून साताऱ्यातील दोन राजे पुन्हा एकदा आमने-सामने आलेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी थेट पत्रकातूनच निशाणा साधला. विकासाची खोटी स्वप्ने दाखवण्याचे दिवस आता संपले असून, सातारकरांना जाब देण्याची वेळ आली आहे, असं शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी म्हटलं आहे. शिवेंद्रसिंहराजे उदयनराजे भोसलेंच्या दिल्ली भेटीवर काय म्हणाले? […]
ADVERTISEMENT
कास धरणाच्या उंची वाढवण्यावरून साताऱ्यातील दोन राजे पुन्हा एकदा आमने-सामने आलेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी थेट पत्रकातूनच निशाणा साधला. विकासाची खोटी स्वप्ने दाखवण्याचे दिवस आता संपले असून, सातारकरांना जाब देण्याची वेळ आली आहे, असं शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
शिवेंद्रसिंहराजे उदयनराजे भोसलेंच्या दिल्ली भेटीवर काय म्हणाले?
“कास धरण उंची वाढवण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे निधी मिळाला. निधी संपल्यामुळं या प्रकल्पाचं काम रखडलं, त्यावेळीही मी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून अजित पवारांच्या सहकार्याने वाढीव निधी मिळवून दिला. आता या प्रकल्पाचं काम ९० टक्के पूर्ण झालं आहे, असं असताना वाढीव पाईपलाईनचा पत्ताच नाही. त्यामुळे सातारकरांना कासचे वाढीव पाणी फक्त पाहावंच लागणार आहे. याला पालिकेचा नियोजनशून्य आणि भ्रष्ट कारभार जबाबदार आहे. आता पालिकेची निवडणूक जवळ आल्यानं उदयनराजे यांची दिल्लीत निवेदनं देवून फोटोसेशन करण्याची नौटंकी सुरु झाली आहे,” अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.
सातारकरांना भुलवायचे प्रकार जोमाने सुरु झाले आहेत -शिवेंद्रसिंहराजे भोसले
खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत जाऊन गृहनिर्माण व नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेतली. यावेळी कास बंदिस्त पाईपलाईनची सुधारणा व त्याच्याशी निगडीत कामांना निधी देण्याची मागणी केली. याच उदयनराजेंच्या या भेटीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘गेले पाच-सहा वर्ष पालिकेत मनमानी, नियोजनशून्य आणि भ्रष्ट कारभाराने कळस गाठला आहे. टेंडर, टक्केवारी, कमिशन यासाठी एकमेकांचे गळे धरून, मारामाऱ्या करून पालिकेला भ्रष्टाचाराचं कुरण बनविलं.’
हे वाचलं का?
‘पालिकेचा आणि सातारकरांचा पैसा लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम पालिकेत सुरु होता. आता निवडणूक आली की, मंजूर नसलेल्या, न होणाऱ्या आणि दुसऱ्याने केलेल्या कामांचे नारळ फोडायचे, मुंबई, दिल्लीवारी करून मंत्र्यांच्या भेटी घेवून निवेदन द्यायचे आणि फोटोसेशन करून सातारकरांना भुलवायचे हे प्रकार जोमाने सुरु झाले आहेत,’ अशी टीका शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप करत उदयनराजेंवर टीका
‘वास्तविक कास धरण उंची वाढवण्याचं काम सुरु झाल्यानंतर पालिकेनं वाढीव पाईपलाईन टाकण्याबाबतचं नियोजन करणं आवश्यक होतं. मात्र सातारकरांशी काहीही देणंघेणं नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांना फक्त पैसा आणि पैसा याशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हतं. सत्तारूढ आघाडीत नगरसेवकांच्या टेंडर, कमिशन आणि टक्केवारीसाठी लागणाऱ्या कळवंडी सातारकरांना उघड्या डोळ्याने पाहायला लागल्या,’ असं शिवेंद्रसिंह राजे म्हणाले.
ADVERTISEMENT
‘डीडीटी पावडरच नव्हे तर कचऱ्यातही पैसे खाण्याची जणू स्पर्धाच सुरु होती. भ्रष्टाचारमुक्त कारभार असा डांगोरा पिटून आणि सर्वसामान्य महिला नगराध्यक्ष असा दिखावा करून सातारकरांना भावनिक करून पालिकेची सत्ता मिळवली आणि पालिकेचा अक्षरशा बाजार करून टाकला. कुठे आहे सर्वसामान्य महिला नगराध्यक्ष? असा सवाल सातारकर वारंवार करीत आहेत.’
ADVERTISEMENT
उदयनराजेंना सातारकर धडा शिकवतील -शिवेंद्रसिंहराजे भोसले
‘राज्य सरकारने हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागासाठी रस्ते आणि मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी ४० कोटी रुपये मंजूर केले आहेत, पण त्यातही पैसे खायला मिळावेत म्हणून आपल्याच मर्जीतल्या ठेकेदाराला हे काम मिळावे म्हणून या कामाची टेंडर प्रक्रिया रखडवून शहराच्या विकासाला खीळ बसवण्याचे काम सुरु आहे. सातारा पालिकेला अक्षरशा लुटून खाणारे आता निवडणूक आली की, निवेदन आणि फोटोसेशन करून विकासाची खोटी स्वप्ने रंगवत आहेत.’
‘धरणाची उंची वाढली, पाणीसाठाही वाढला पण सातारकरांना वाढीव पाणी मात्र मिळणार नाही हे पाप तुम्ही केलं. आता तुमच्या पापाचा घडा भरला असून, सुज्ञ सातारकर तुम्हाला चांगला धडा शिकवतील,’ असं आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकात म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT