शिवसेनेचा ‘लाव रे व्हिडिओ’, मोदींवर टीका करणारे राणेंचे जुने व्हिडिओच दाखवले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: भाजपचे मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर तुफान टीका केली. यावेळी शिवसेनेने फक्त सत्तेसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली. कारण निवडणुकीआधी त्यांनी पवार आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. असा आरोप राणेंनी केला. ज्याला तात्काळ शिवसेनेने देखील पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं.

ADVERTISEMENT

यावेळी शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत हे देखील संपूर्ण तयारीनिशी पत्रकार परिषदेला आल्याचं पाहायला मिळालं. नारायण राणे हे काँग्रेसमध्ये असताना त्यांनी भाजपवर आणि विशेषत: नरेंद्र मोदींवर कोणत्या भाषेत टीका केली होती त्याचे व्हिडिओच यावेळी दाखविण्यात आले.

‘नरेंद्र मोदी म्हणजे खोटारडे’ अशी टीका राणेंनी केली होती. मात्र, फक्त खुर्चीसाठी राणे हे भाजपमध्ये गेले. त्यामुळे शिवसेनेवर आरोप करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. असं म्हणत राऊतांनी राणेंवर निशाणा साधला.

हे वाचलं का?

…म्हणून बाळासाहेबांनी राणेंना कधीही नेते पद दिलं नाही

‘संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हयातीत ज्यांना-ज्यांना नेते पद दिलं त्यामध्ये संजय राऊत हे देखील होते. नारायण राणेंना बाळासाहेबांनी नेते ही उपाधी कधीही दिली नाही. कारण बाळासाहेबांना माहिती होतं की, हा माणूस सत्तापिपासू आहे, स्वार्थी आहे आणि त्यामुळेच जरी राणेंनी 26 वर्ष शिवसेनेत घालवली असली तरी राणेंना बाळासाहेबांनी त्यांना नेता केलं नाही. यामधूनच त्यांची काय लायकी आहे हे दिसून येतं.’

ADVERTISEMENT

‘दुसरीकडे संजय राऊत सामनाचे संपादक आहेत, खासदार आहेत. पण त्यासोबत ते आमचे आदरणीय नेते देखील आहेत. त्यामुळे उघडपणे त्यांना ईडीच्या माध्यमातून जो त्रास दिला जात आहे. पण संजय राऊत हे खऱ्या अर्थाने निधड्या छातीचे शिवसैनिक असल्याने त्यांनी जाहीरपणे सर्वांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली आणि उघडपणे ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांबाबत बोलण्यास सुरुवात केली.’

ADVERTISEMENT

‘मिलिंद नार्वेकर म्हणजे तोच का जो ‘बॉय’चं काम करायचा’, राणेंची नार्वेकरांवर बोचरी टीका

‘याउलट राणेंच्या मागे जेव्हा ईडी लागली त्यावेळी नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव गुपचूप पाठीमागच्या दाराने सरळ दिल्लीला गेले आणि चोरवाट्याने दिल्लीच्या भाजपच्या नेत्यांसमोर शरणागती पत्करली त्यांच्यासमोर लोटांगण घातलं आणि स्वार्थीपणाने आणि केवळ आपली ईडीमधून सुटका व्हावी म्हणून राणेंसारख्या संधीसाधू माणसाने भाजपमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसशी बेईमानी केली.’ अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT