Viral Video: मुलाला साडीने बांधून 10व्या मजल्यावरून खाली लटकवलं, जन्मदात्या आईने असं का केलं?
फरीदाबाद: दिल्लीच्या नजीक असलेल्या फरीदाबादमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. जे वाचून तुम्हाला देखील धक्का बसेल आणि तुम्हालाही प्रश्न पडेल की, एखादी आई देखील असे कसे करू शकते का? फरीदाबादमध्ये एक धक्कादायक व्हीडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक आई स्वतःच्याच मुलाला साडीने बांधून 10व्या मजल्यावरून नवव्या मजल्यावर लटकवत होती. सुदैवाने कोणतीही चूक […]
ADVERTISEMENT

फरीदाबाद: दिल्लीच्या नजीक असलेल्या फरीदाबादमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. जे वाचून तुम्हाला देखील धक्का बसेल आणि तुम्हालाही प्रश्न पडेल की, एखादी आई देखील असे कसे करू शकते का? फरीदाबादमध्ये एक धक्कादायक व्हीडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक आई स्वतःच्याच मुलाला साडीने बांधून 10व्या मजल्यावरून नवव्या मजल्यावर लटकवत होती.
सुदैवाने कोणतीही चूक झाली नाही आणि मुलगा पुन्हा सुखरूप वर आला. पण या सगळ्यात थोडीशीही चूक झाली असती तर क्षणार्धात मुलाचा जीवही जाऊ शकला असता.
व्हायरल झालेला व्हीडिओ फरीदाबादच्या सेक्टर-82 येथील फ्लोरिडा सोसायटीचा आहे. या व्हीडिओची चौकशी करत असताना आमची टीम फ्लोरिडा सोसायटीतील महिलेपर्यंत पोहोचली. जिने स्वतःच आपल्या मुलाला दहाव्या मजल्यावरून नवव्या मजल्यावर लटकवले होते.
त्यावेळी महिलेने जी माहिती सांगितली ते ऐकून आपल्यालाही प्रचंड आश्चर्य वाटेल. फ्लोरिडा सोसायटीमधील ही महिला 10व्या मजल्यावर राहते. जिचे कपडे तिच्या खालच्या मजल्यावर पडले होते आणि त्या मजल्यावरील ते घर बंद होते. त्यामुळे महिलेला तेथे जाऊन स्वत:चे कपडे आणता येत नव्हते. त्यामुळे महिलेने एक अत्यंत विचित्र शक्कल लढवली.










