Shraddha Walker Murder : श्रद्धाची हत्या लग्नाच्या तगाद्यामुळे नाही, तर…; समोर आलं धक्कादायक कारण
वसईतल्या श्रद्धा वालकरची तिच्याच लिव-इन पार्टनर आफताब पूनावाला याने हत्या केली. आफताब पूनावाला सध्या तिहार तुरूंगात असून, या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत श्रद्धा वालकर लग्नाची मागणी करत असल्यानं तिची हत्या केल्याचं आफताब म्हणाला होता. पण, हत्येमागचं वेगळं आणि धक्कादायक कारण समोर आलंय. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिल्ली पोलीस […]
ADVERTISEMENT
वसईतल्या श्रद्धा वालकरची तिच्याच लिव-इन पार्टनर आफताब पूनावाला याने हत्या केली. आफताब पूनावाला सध्या तिहार तुरूंगात असून, या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत श्रद्धा वालकर लग्नाची मागणी करत असल्यानं तिची हत्या केल्याचं आफताब म्हणाला होता. पण, हत्येमागचं वेगळं आणि धक्कादायक कारण समोर आलंय.
ADVERTISEMENT
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिल्ली पोलीस दिल्ली-मुंबईसह इतर राज्यातही पुरावे शोधत आहेत. आतापर्यंत श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे 13 तुकडे पोलिसांच्या हाती लागले असून, ज्या फ्लॅटमध्ये श्रद्धा वालकरची हत्या करण्यात आली. त्या फ्लॅटमधील बाथरुम, किचन आणि बेडरुममध्ये रक्ताचे डागही आढळून आले आहेत.
आफताब पूनावालाची चौकशी सुरूच…
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास करताना दिल्ली पोलिसांकडून आफताबचीही चौकशी केली जात आहे. श्रद्धा वालकर सातत्यानं लग्न करण्याची मागणी करत होती आणि त्यातून वाद होऊन हत्या केल्याचं आफताबने सांगितलं होतं. मात्र, आता यात नवी माहिती समोर आलीये.
हे वाचलं का?
दिल्ली पोलिसांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरची हत्या लग्नासाठी तगादा लावल्यामुळे केली नाही. श्रद्धा वालकरला आफताब पूनावालासोबत ब्रेकअप करायचं होतं. तिची हिच गोष्ट आफताबला पटली नाही आणि त्याने निर्दयीपणे श्रद्धाला संपवलं.
आफताबकडून नेहमी होणाऱ्या मारहाणीला आणि त्यांच्या वागण्याला श्रद्धा कंटाळली होती. त्यामुळे तिने आफताबसोबत ब्रेकअफ करण्याचा निर्णय घेतला होता. 3-4 मे ला श्रद्धाने ब्रेकअफ करायचं ठरवलं होतं. त्यानंतर ही गोष्ट आफताबला कळली आणि त्याला हे आवडलं नाही. त्यातूनच त्याने श्रद्धाची हत्या केल्याचं पोलिसांतील सूत्रांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
Shraddha Murder Case : “श्रद्धाचं फ्रीजमध्ये ठेवलेलं शीर दररोज पाहायचो” ऐकून पोलिसही हादरले
ADVERTISEMENT
आफताबने श्रद्धाला आधीच दिली होती तुकडे करण्याची धमकी
श्रद्धा वालकरला तुकडे करून फेकून देण्याची धमकी आफताबने आधीच दिली होती, हे तिने 2020 मध्ये पोलिसांना दिलेल्या तक्रारीमुळे समोर आलं होतं. 23 नोव्हेंबर 2020 रोजी श्रद्धा वालकरने तुळींज पोलीस ठाण्यात आफताब पूनावालाविरुद्ध तक्रार दिली होती.
या तक्रारीत श्रद्धा वालकरने आफताब पूनावालावर गंभीर आरोप केलेले आहेत. “तो (आफताब पूनावाला) मला धमकी देतोय की, माझे तुकडे तुकडे करून फेकून देईन. मागील सहा महिन्यांपासून तो (आफताब पूनावाला) मला मारहाण करतोय. मला जिवे मारण्याची धमकी देत असल्यानं पोलिसांत तक्रार देण्याचं माझं धाडस होत नव्हतं.”
तर श्रद्धाचा जीव वाचला असता : तक्रार अर्ज समोर आल्यावर गृहमंत्री अन् पोलीस काय म्हणाले?
“माझ्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकाराची त्याच्या कुटुंबियांनाही माहिती आहे. आता त्याच्यासोबत (आफताब पूनावाला) राहण्याची माझी इच्छा नाहीये. तो (आफताब पूनावाला) मला ब्लॅकमेल करतोय. त्यामुळे माझं काही बरंवाईट झालं तर त्याला तोच (आफताब पूनावाला) जबाबदार असेल”, असं श्रद्धाने 2020 मध्ये दिलेल्या तक्रारीत स्पष्ट म्हटलेलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT