भांड्याला भांडं कधीच लागणार नाही! महिला त्यांच्या पतीला धोका का देतात? 'ही' कारणे एकदा वाचाच
गेल्या काही दशकांमध्ये, आपल्या जोडीदाराला धोका देणाऱ्या महिलांची संख्या सातत्याने वाढत असल्याचं अनेक सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या आकडेवारीनंतर एकच प्रश्न उभा राहतो, महिला पुरुषांची फसवणूक का करतात? जाणून घ्या, तज्ज्ञांनी काय सांगितलंय?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महिला त्यांच्या पतीला धोका का देतात?
पती आणि पत्नीच्या नात्यात दुरावा का निर्माण होतो?
पत्नीने धोका देऊ नये, यासाठी काय करावे?
प्रेमात विश्वास ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. प्रेमात जर विश्वासालाच तडा गेला तर ते नातं संपण्याच्या मार्गावर येतं. प्रियकर आणि प्रेयसी असो किंवा नवरा आणि बायको असो, नात्यात मिळालेला धोका हे जीवनातील मोठ्या दु:खापेक्षा कमी नाही.
अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील नॅशनल ओपिनियन रिसर्च सेंटर (NORC) च्या 2022 मधील ग्लोबल सोशल सर्व्हे (GSS) मध्ये अशाच काही धक्कादायक गोष्टी आढळून आल्या. या सर्वेक्षणादरम्यान, 20 टक्के पुरुष आणि 13 टक्के महिलांनी त्यांच्या जोडीदारांची फसवणूक केल्याचे कबूल केले.
सर्वेक्षणातील आकडेवारी
याव्यतिरिक्त, 20219 च्या ब्रिटिश संशोधन आणि डेटा अॅनालिटिक्स फर्म YouGov ने 1 हजारहून अधिक विवाहित लोकांवर केलेल्या सर्वेक्षणातही असेच परिणाम समोर आले. यापैकी 20 टक्के पुरुष आणि 10 टक्के महिलांनी त्यांच्या जोडीदाराची फसवणूक केल्याचे कबूल केले.
गेल्या काही दशकांमध्ये, आपल्या जोडीदाराला धोका देणाऱ्या महिलांची संख्या सातत्याने वाढत आहे. 2010 मध्ये, पत्नींमध्ये पतींना फसवण्याची प्रवृत्ती 20 वर्षांपूर्वीच्या तुलनेत 40 टक्क्यांनी जास्त असल्याचे आढळून आले. या आकडेवारीनंतर एकच प्रश्न उभा राहतो, महिला पुरुषांची फसवणूक का करतात?










