12th Result 2025 : 'या' तारखेला 1 वाजता बारावीचा निकाल होणार जाहीर! 'या' वेबसाईट्सवर पाहू शकता रिझल्ट

मुंबई तक

Maharashtra 12th Result 2025 : महाराष्ट्र बोर्ड 12 वीचा रिझल्ट उद्या सोमवारी 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता घोषित केला जाणार आहे.

ADVERTISEMENT

HSC Result 2025 Latest Update
HSC Result 2025 Latest Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आहे. कोणत्या वेबसाईटवर पाहू शकता निकाल?

point

कसं पाहू शकता निकाल?

point

12 वीच्या निकालाबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Maharashtra 12th Result 2025 : महाराष्ट्र बोर्ड 12 वीचा रिझल्ट उद्या सोमवारी 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता घोषित केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) ने आज रविवारी या निकालाची तारीख आणि वेळ अधिकृतपणे जाहीर केली. विद्यार्थी बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर निकाल पाहू शकतात.जे विद्यार्थी परीक्षेला बसले होते, ते बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करून निकालाची सर्व माहिती वाचू शकतात. निकाल पाहण्यासाठी रोल नंबर आणि आईचं नाव वेबसाईटवर टाकावं लागणार आहे.

कोणत्या वेबसाईटवर पाहू शकता निकाल?

  1. mahresult.nic.in
  2. mahahsscboard.in
  3. hscresult.mkcl.org

हे ही वाचा >> Maharashtra Board HSC Results 2025 : सर्वात मोठी अपडेट! बारावीच्या निकालाची तारीख आली समोर, निकाल कुठे पाहाल?

कसं पाहू शकता निकाल?

  • सर्वात आधी महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट hscresult.mkcl.org किंवा mahahsscboard.in वर भेट द्या.
  • त्यानंतर होमपेजवर उपलब्ध असलेल्या 12 वी एचएससी रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव टाका.
  • आता महाराष्ट्र बोर्ड 12 वी रिझल्ट 2025 तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • त्यानंतर मार्कशिट पीडीएफ पाहा आणि त्यांना डाऊनलोड करा.
     

बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात कमीत कमी 35 टक्के गुण मिळाले पाहिजेत. दोन्ही इयत्तेचा पासिंग क्रायटेरिया एकसारखाच आहे. प्रत्येक विषयाला 100 गुण असतात. यामध्ये थेअरी 80 गुण आणि प्रक्टिकल/इंटरनल असेसमेंट 20 गुणांची असते. पास होण्यासाठी 100 पैकी कमीत कमी 35 टक्क्यांची आवश्यकता असते. म्हणजेच 80 गुणांच्या थेअरी पेपरमध्ये 28 गुण आणि प्रक्टिकलमध्ये आवश्यक मार्क्स मिळवून पास होण्याची गरज असते.

हे ही वाचा >> चौथ्या बायकोचा खून करून नवऱ्याने बेडरूममध्ये केलं धक्कादायक कृत्य! लोकांनी केला घटनेचा पर्दाफाश


 

हे वाचलं का?

    follow whatsapp