Maharashtra Board SSC Result 2025 : 10 वीच्या निकालाची तारीख लवकरच, रोल नंबर 'असा' करा डाऊनलोड

मुंबई तक

SSC Result 2025 Roll Number Download : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत घेण्यात आली.

ADVERTISEMENT

How To Download SSC Result Roll Number
How To Download SSC Result Roll Number
social share
google news

बातम्या हायलाइट

point

दहावीचा निकाल कधी लागणार?

point

कसा कराल रोल नंबर डाऊनलोड?

point

'या' वेबसाईट्सवर दहावीचा निकाल पाहू शकता

SSC Result 2025 Roll Number Download : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत घेण्यात आली. मागील काही दिवसांपासून या निकालाच्या महत्त्वाच्या अपडेट्स व्हायरल होत आहेत. दहावीच्या परीक्षेत बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांसह पालकांनाही या निकालाची प्रतिक्षा लागली आहे.

दरम्यान, उत्तर पत्रिका तपासणीचे काम अंतिम टप्प्यात सुरु आहे. मे महिना सुरु झाला असून बोर्डाकडून दहावीच्या निकालाची अधिकृत तारीख लवकरच घोषित केली जाऊ शकते. परंतू, निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना रोल नंबर कसा डाऊनलोड करायचा याबद्दल माहित नसतं. पण आम्ही तुम्हाला रोल नंबर डाऊनलोड करण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 

दहावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन घोषित केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर डाऊनलोड करण्याची आवश्यकता लागणार आहे. रोल नंबर ऑनलाईन जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी ते कसे डाऊनलोड करायचे, याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाईट mh-hsc.ac.in वर माहिती भरू शकतात. त्यानंतर रोल नंबर डाऊनलोड करू शकता.

हे ही वाचा >> जिथे चेंगराचेंगरी झाली त्या लैराई देवीच्या मंदिरासमोर आगीवरून का चालतात भक्त, काय आहे नेमकी प्रथा?

रोल नंबर डाऊनलोड करण्यासाठी काय कराल?

  1. दहावीच्या विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईट mh-hsc.ac.in वर लॉन करा.
  2. त्यानंतर आवश्यक ती माहिती वेबसाईटवर भरा.
  3. तुमचं संपूर्ण नाव टाका. त्यानंतर सर्च बटणावर क्लिक करा.
  4. तुम्ही रोल नंबर स्क्रीनवर पाहू शकता. त्यानंतर रोल नंबर डाऊनलोड करा.

गतवर्षी वर्षी दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात आला होता. 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यामध्ये 8,64,120 मुलांचा समावेश होता. तर 7,47,471 मुली आणि 19 ट्रान्सजेंडर दहावीच्या परीक्षेला बसले होते. दरम्यान, यंदाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख शिक्षण मंडळाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाही. 

हे ही वाचा >> Pune News: नमाज अदा करण्यावरून राडा, मंदिरात नेमकं काय केलं.. पुण्यातील नेमकं प्रकरणं काय?

या वेबसाईट्सवर पाहू शकता दहावीचा निकाल

  • https://mahresult.nic.in
  • https://sscresult.mkcl.org  
  • https://sscresult.mahahsscboard.in
  • https://results.digilocker.gov.in
     

हे वाचलं का?

    follow whatsapp