Personal Finance: बँकांनी FD व्याजदर कमी केल्याने नुकसान? टेन्शन घेऊ नका.. 'या' नियमामुळे होईल फायदा!

मुंबई तक

Personal Finance: सरकारने 1 एप्रिल 2025 पासून TDS नियमांमध्ये मोठा बदल केला आहे, ज्यामुळे वृद्ध आणि सामान्य लोकांना एफडीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा फायदा होईल.

ADVERTISEMENT

Personal Finance
Personal Finance
social share
google news

बातम्या हायलाइट

point

TDS नियमांमध्ये मोठा बदल

point

वृद्ध आणि सामान्य लोकांना एफडीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा फायदा

point

सरकारच्या 'या' नियमामुळे होईल फायदा

Personal Finance: बँकांनी 1 मे पासून मुदत ठेवींवरील (FD) व्याजदर कमी केले आहेत. यामुळे मासिक व्याज उत्पन्नावर काही प्रमाणात परिणाम होणार आहे. मात्र, ही चिंतेची बाब नाही. सरकारच्या नवीन TDS (Tax Deducted at Source) नियमांमुळे, आता व्याज उत्पन्नावरील कर कपातीमध्ये बदल होणार आहेत. अशात, मासिक, तिमाही किंवा वार्षिक परताव्यावर कोणताही परिणाम होऊ शकत नाही.

सरकारने 1 एप्रिल 2025 पासून TDS च्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. याचा वृद्ध आणि मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना थेट फायदा मिळणार आहे. असे लोक FD, MIS किंवा पोस्ट ऑफिससारख्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात आणि व्याजाद्वारे त्यांचे मासिक खर्च भागवतात. आता, कमी व्याज मिळण्याची चिंता करण्याऐवजी त्यांना TDS बचत केल्यामुळे अधिक दिलासा मिळेल.

आता कमी टॅक्स कपात! जाणून घ्या, नवा नियम

वृद्ध व्यक्तींना दिलासा

60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या गुंतवणूकदारांसाठी, FD मधून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावरील TDS सवलतीची मर्यादा 50,000 रुपयांवरून वाढवून 1 लाख रुपये करण्यात आली आहे. याचाच अर्थ आता वार्षिक 1 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर कोणताही कर कापला जाणार नाही. जर ते यापेक्षा जास्त असेल तरच 10 टक्के TDS भरावा लागेल.

सामान्य नागरिकांना फायदा

आतापर्यंत सामान्य नागरिकांना वार्षिक 40 हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज उत्पन्नावर 10 टक्के टीडीएस भरावा लागत होता, परंतु आता ही मर्यादा 50 हजार रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच एफडी, आरडी किंवा एमआयएसमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता जास्त व्याज मिळत असूनही TDS मधून सूट मिळेल.

समजून घ्या नेमकं गणित

रामेश्वर काळे यांच्या FD उत्पन्नावर परिणाम

  • वय: 62 वर्षे (वरिष्ठ नागरिक) 
  • गुंतवणूक रक्कम: 20 लाख
  • बँक: HDFC Bank
  • FD कालावधी: 5 वर्षे
स्थिती जुना नियम  नवा नियम
व्याज दर 7.5 टक्के 7.0 टक्के 
वार्षिक व्याज 1, 50,000 रुपये  1,40,000 रुपये
वार्षिक TDS कपात 10,000 रुपये 4,000 रुपये
मासिक उत्पन्नानंतर 11,667  रुपये 11,334  रुपये

व्याजदर कमी झाल्यामुळे, रामेश्वर यांचे मासिक उत्पन्न 1,166 रुपयांनी कमी झाले, परंतु TDS मध्ये दरमहा 500 रुपयांची बचत झाली. म्हणजेच निव्वळ तोटा दरमहा फक्त 333 रुपये होता. एकंदरीत, मासिक उत्पन्नात फारसा फरक पडणार नाही.

TDS वाचवण्याचे हे मार्ग जाणून घ्या, अन्यथा अनावश्यकपणे पैसे कापले जातील

जर तुमचे एकूण उत्पन्न कर वर्गात येत नसेल, तर तुम्ही बँकेत 15G फॉर्म (60 वर्षांपेक्षा कमी) किंवा 15H (60 वर्षांपेक्षा जास्त) सादर करू शकता. यानंतर, नवीन नियम असूनही तुम्ही आधीच कमवत असलेले पैसे देखील वाचवू शकता. जरी TDS कापला गेला असला तरी, ITR दाखल करून कर रिफंड मिळू शकतो. यासाठी बँकेत पॅन क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे. जर असे केले नाही तर बँक 10 टक्के ऐवजी 20 टक्के पर्यंत टीडीएस कापू शकते.

'या' गुंतवणूकीवर TDS मध्ये बदल

उत्पन्नाचं स्त्रोत  यापूर्वीची TDS मर्यादा नवी TDS मर्यादा 
वृद्धांचं व्याज उत्पन्न  50,000 रुपये प्रति वर्ष 1,0,000 रुपये प्रति वर्ष
सामान्य नागरिकांचं व्याज उत्पन्न 40,000 रुपये प्रति वर्ष 50,000 रुपये प्रति वर्ष
म्यूचुअल फंड डिव्हिडेंट 5,000 रुपये  10,000 रुपये
विमा एजंट कमिशन  15,000 रुपये 20,000 रुपये
भाडं  2.4 लाख रुपये वार्षिक  6 लाख रुपये वार्षिक 
लॉटरी/ हॉर्स रेसिंगमधील यश एकूण 10,000 वार्षिक एका वेळी 10,000 रुपयांपेक्षा अधिक 

 

Personal Finance सीरीजमधील या बातम्याही वाचा:

1. Personal Finance: शेअर बाजाराची भीती वाटते? तर Gold ETF मध्ये गुंतवा पैसे, 10 हजार रुपयात व्हाल करोडपती!

2. पैसा-पाणी: भारतीयांना सोन्याचं व्यसन, सरकारने मानली हार.. 3 मोठ्या योजना अपयशी!

3. Personal Finance: ATM मधून पैसे काढणे होणार महाग, 1 मे पासून मोजावे लागणार 'एवढे' पैसे

4. Personal Finance: घर खरेदी करावं की भाड्याने घ्यावं.. काय चूक, काय बरोबर? 'हा' फॉर्म्युला ठेवा लक्षात?

5. Personal Finance तुम्हाला मिळतील 4 कोटी, फक्त SNP हा प्लॅन ठेवा लक्षात.. हाती येईल प्रचंड पैसा!

6. Personal Finance: FD पेक्षा जास्त मिळतील पैसे, 'ही' जबरदस्त योजना तुम्हाला माहिती आहे का?

7. Personal Finance: जर तुम्हाला घरबसल्या PF चे पैसे हवे तर फक्त 'एवढंच' करा.., थेट तुमच्या खात्यात पैसे

8. गुड न्यूज: तुमचा घराचा हप्ता होणार कमी, EMI भरताना 'एवढे' पैसे वाचणार!

9. Personal Finance: शेअर मार्केटचा बाजारच उठला, आता करावं तरी काय?

10. Personal Finance: ATM वापरलं की, तुमचे पैसे कापले जाणार, 1 मे पासून येणार नियम पाहून ठेवा बरं!

11. Personal Finance: 50,000 रुपये पगार असलेली लोकंही बनू शकतात करोडपती, फक्त 300...

12. Personal Finance: EPFO कडून मोठा दिलासा, PF मधून काढता येणार 5 लाख... तेही थेट UPI आणि ATM वापरून!

13. Personal Finance: 500 रुपयांच्या मासिक SIP ने किती दिवसांत होऊ शकता कोट्यधीश? संपूर्ण गणित घ्या समजून

14. SIP सारखी जबरदस्त कमाई आणि FD सारखे दर महिन्याला पैसे, SWP प्लॅन नेमका काय?

 

हे वाचलं का?

    follow whatsapp