Personal Finance: शेअर बाजाराची भीती वाटते? तर Gold ETF मध्ये गुंतवा पैसे, 10 हजार रुपयात व्हाल करोडपती!
Personal Finance: झेरोधाचे (Zerodha) सीईओ नितीन कामत यांनीही एका ट्विटमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचे समर्थन केले आहे. कामत म्हणतात की 2000 पासून आतापर्यंत (2025 पर्यंत) सोन्याने निफ्टी 50 पेक्षा चांगले परतावे दिले आहेत.
ADVERTISEMENT

Personal Finance Tips Gold ETF: मुंबई: शेअर बाजारात अनिश्चिततेचा काळ हा बऱ्याचदा असतो. त्यामुळे गुंतवणूकदारांना काय करावे याबद्दल संभ्रम असतो. या अनिश्चिततेच्या काळात SIP मध्ये गुंतवणूक करणारे देखील घाबरलेले आहेत. आता प्रश्न असा आहे की, गुंतवणूक कुठे करावी जेणेकरून नफा चांगला होईल आणि शेअर बाजारातील घसरणीसारख्या नकारात्मक परताव्याचा धोकाही कमी होईल. अशा परिस्थितीत, GOLD ETF (Gold Exchange Traded Fund) गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम परतावा देणारा ठरत आहे.
झेरोधाचे (Zerodha) सीईओ नितीन कामत यांनीही एका ट्विटमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याचे समर्थन केले आहे. कामत म्हणतात की 2000 पासून आतापर्यंत (2025 पर्यंत) सोन्याने निफ्टी 50 पेक्षा चांगला परतावा दिला आहे. सोन्याने 2027% परतावा दिला आहे. याचा अर्थ असा की ₹1 लाखाची गुंतवणूक 25 वर्षांनी ₹ 21 लाखांपेक्षा जास्त झाली असेल. आर्थिक संकटांच्या काळातही (उदा. 2008 ची मंदी, कोविड-19) सोन्याने स्थिरता दाखवली आहे.
सोन्याने शेअर बाजारापेक्षा चांगली कामगिरी केली
2000 ते 2025 या कालावधीत निफ्टी 50 ने अंदाजे 1470% परतावा दिला आहे. 1 लाख रुपयांची गुंतवणूक आता सुमारे 15.7 लाख रुपये होईल. निफ्टीनेही चांगली कामगिरी केली असली तरी सोन्याने त्याला मागे टाकले आहे. नितीन कामत यांचा असा विश्वास आहे की, सोन्याने दीर्घकाळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे, विशेषतः जेव्हा बाजारात अनिश्चितता असते. कामत म्हणतात की, सोन्याच्या किंमती का वाढतात हे कोणीही सांगू शकत नाही पण ते खरोखर काम करतं.
सरकारने SGBचा नवीन इश्यू थांबवला, Gold ETF हाच चांगला पर्याय
सरकारने Sovereign Gold Bondsस (SGBs) चे नवीन इश्यू थांबवले आहे. याचा अर्थ SGB आता उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय म्हणून पाहिले जात आहे. नितीन कामत देखील याला एक चांगला पर्याय म्हणून पाहत आहेत. आपल्या पूर्वजांनीही सोन्यातील गुंतवणूक चांगली मानली आहे. वाईट काळात सोने उपयुक्त ठरते असे त्यांचे नेहमीच मत राहिले आहे.










