Personal Finance: ATM मधून पैसे काढणे होणार महाग, 1 मे पासून मोजावे लागणार 'एवढे' पैसे
Personal Finance: जर तुम्ही नियमितपणे एटीएममधून पैसे काढत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 1 मे 2025 पासून एटीएम व्यवहार महाग होणार आहेत.
ADVERTISEMENT

Personal Finance Tips for ATM: जर तुम्ही नियमितपणे ATM मधून पैसे काढत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 1 मे 2025 पासून ATM व्यवहार महाग होणार आहेत, त्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळी पैसे काढताना जास्त शुल्क भरावे लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे, ज्या अंतर्गत इंटरचेंज फी वाढवल्या जातील. नवीन नियम काय आहेत आणि त्यांचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल ते जाणून घ्या
होम नेटवर्कबाहेर ATM वापरणे होईल महाग
1 मे पासून लागू होणाऱ्या नवीन नियमांनुसार, जर तुम्ही तुमच्या तुमच्या बँकेच्या नेटवर्क व्यतिरिक्त इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढले किंवा बॅलन्स तपासला तर तुम्हाला वाढीव शुल्क भरावे लागेल. सध्या, होम नेटवर्कच्या बाहेर एटीएम वापरण्यासाठी शुल्क आकारले जाते, परंतु आता हे शुल्क आणखी वाढणार आहे. हा बदल एनपीसीआयच्या प्रस्तावावर आधारित आहे, ज्याला आरबीआयने मान्यता दिली आहे.
हे ही वाचा>> Personal Finance: घर खरेदी करावं की भाड्याने घ्यावं.. काय चूक, काय बरोबर? 'हा' फॉर्म्युला ठेवा लक्षात?
शुल्क किती वाढेल?
नवीन नियमांनुसार, जर तुम्ही तुमच्या बँकेव्यतिरिक्त इतर कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढले तर आतापर्यंत प्रत्येक व्यवहारासाठी तुम्हाल 17 रुपये शुल्क आकारले जात होते, जे आता 19 रुपये होईल. त्याच वेळी, बॅलन्स तपासण्याचे शुल्क प्रत्येक वेळेस 6 रुपयांवरून 7 रुपये होईल. ही वाढ मोफत ट्रान्जेक्शन मर्यादेपेक्षा जास्त असलेल्या व्यवहारांवर लागू होईल.
मोफत ट्रान्जेक्शन मर्यादा किती आहे?
बँकांनी मोफत ट्रान्जेक्शनवर मर्यादा घातली आहे. महानगरांमध्ये, तुमच्या होम बँकेव्यतिरिक्त इतर बँकांच्या ATM मधून तुम्ही 5 मोफत ट्रान्जेक्शनची परवानगी आहे, तर नॉन-मेट्रो शहरांमध्ये ही मर्यादा 3 ट्रान्जेक्शनची आहे. जर ट्रान्जेक्शन या मर्यादेपेक्षा जास्त असतील तरच नवीन शुल्क लागू होईल.










