CBSE Result 2025: 10 वी आणि 12 वीची मार्कशीट DigiLocker मधून करा डाऊनलोड!

मुंबई तक

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, दरवर्षी CBSC डिजीलॉकर वेबसाइट किंवा अॅप आणि उमंग अॅपद्वारे निकाल तपासण्याचा पर्याय देते. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी DigiLocker च्या अधिकृत वेबसाइट cbseservices.digilocker.gov.in किंवा अॅपला भेट देऊन त्यांचे निकाल तपासू शकतात.

ADVERTISEMENT

DigiLocker मधून 10 वी आणि 12 वीच्या मार्कशीट्स डाउनलोड करण्याची 'ही' पद्धत
DigiLocker मधून 10 वी आणि 12 वीच्या मार्कशीट्स डाउनलोड करण्याची 'ही' पद्धत
social share
google news

बातम्या हायलाइट

point

DigiLocker मधून निकाल डाउनलोड करण्याची पद्धत

point

DigiLocker मधून निकाल कसा डाउनलोड करावा?

point

CBSC च्या अधिकृत वेबसाइटवरुन निकाल डाउनलोड करण्याची प्रक्रिया

CBSE 10th, 12th Result 2025 on DigiLocker: लवकरच CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 44 लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या बोर्डाच्या निकालांची (CBSE Result 2025) वाट पाहत आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in आणि results.cbse.nic.in वर भेट देऊन त्यांच्या मार्कशीट्स ऑनलाइन तपासू शकतात.


CBSC चा निकाल डिजिलॉकरवरही 

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, दरवर्षी CBSC डिजीलॉकर वेबसाइट किंवा अॅप आणि उमंग अॅपद्वारे निकाल तपासण्याचा पर्याय देते. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी DigiLocker च्या अधिकृत वेबसाइट cbseservices.digilocker.gov.in किंवा अॅपला भेट देऊन त्यांचे निकाल तपासू शकतात.

How to Check CBSE 10th, 12th Result on DigiLocker: DigiLocker मधून 10 वी आणि 12 वीच्या मार्कशीट्स डाउनलोड करण्याची पद्धत

1. DigiLocker च्या वेबसाइट digilocker.gov.in ला भेट द्या किंवा Play Store वरून DigiLocker अॅप डाउनलोड करा.
2. होम पेजवरील साइन अप लिंकवर क्लिक करा.
3. तुमचे नाव (आधार कार्डनुसार), जन्मतारीख, कॅटेगरी, वैध मोबाइल नंबर, ईमेल आयडी, आधार क्रमांक आणि 6 अंकी सिक्योरिटी पिन भरा. 
4. सर्व आवश्यक तपशील भरल्यानंतर, यूजरनेम सेट करा.
5. खाते तयार झाल्यानंतर, 'CBSE' लिंकवर क्लिक करा.
6. येथे, 'CBSE XI Result 2025', 'CBSE XII Result 2025' या लिंकवर क्लिक करा.
7.  तुमचा रोल नंबर आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
8. तुम्ही निकाल डाउनलोड करू शकता आणि प्रिंटआउट घेऊन ते तुमच्याकडे ठेवू शकता.

हे ही वाचा: Who is Avneet Kaur: कोण आहे ही अवनीत? जिच्यामुळे विराट कोहलीचा टप्प्यातच कार्यक्रम झालाय!

CBSE चा निकाल कधी येईल?

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, निकाल जाहीर करण्यासाठी बोर्डाची सर्व तयारी झाली आहे, परंतु निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेळ अद्याप निश्चित झालेली नाही. बोर्ड लवकरच सोशल मीडिया अकाउंटद्वारे याबद्दल माहिती देईल. मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात बोर्ड दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना नवीनतम माहितीसाठी फक्त CBSC च्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया अकाउंटवर अवलंबून राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

हे ही वाचा: Maharashtra Board Result 2025 : दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर! 'या' लिंकवर पाहता येणार रिझल्ट

गेल्या वर्षी, दहावी-बारावीचा निकाल 13 मे 2024 रोजी जाहीर झाला होता. बारावीचा निकाल 87.98 टक्के होता, जो 2023 पेक्षा चांगला होता. दहावीचा निकाल 96.60 टक्के होता, जो 2023 च्या तुलनेत 0.48 टक्क्यांनी जास्त होता. यावर्षीही चांगला निकाल अपेक्षित आहे. सीबीएसईने विद्यार्थ्यांना निकालाच्या अचूक तारखेसाठी अधिकृत सूचनेची वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचा देखील बोर्डाने सल्ला दिला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp