CBSE Result 2025: विद्यार्थ्यांसाठी नवा नियम, निकालाआधी बरंच काही बदललं.. आताच पाहा!
CBSE बोर्डाकडून निकालाची नेमकी तारीख आणि वेळ याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, CBSE ने निकालानंतरच्या प्रक्रियेत मोठा बदल केला असल्याचं वृत्त समोर आलं आहे. नेमका कोणता बदल करण्यात आला आहे? याविषयी सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
CBSC बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाआधी 'या' प्रक्रियेत बदल
कोणत्या नियमात झाला बदल?
बोर्डाकडून पालकांना आणि विद्यार्थ्यांना सल्ला
CBSE Result 2025: CBSC बोर्डाच्या 2025 वर्षातील 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या निकालाची विद्यार्थी अगदी आतूरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आद्याप बोर्डाकडून निकालाची नेमकी तारीख आणि वेळ याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. CBSE बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता सांगितली जात आहे. मात्र, यादरम्यान CBSE ने निकालानंतरच्या प्रक्रियेत मोठा बदल केला असल्याचं वृत्त समोर आलं आहे. आता विद्यार्थ्यांना प्रथम मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी मिळू शकेल आणि त्यानंतरच ते गुणांची पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतील.
काय आहे नवीन प्रक्रिया?
1. उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी प्राप्त करणे
2. गुण पडताळणी, पुनर्मूल्यांकन किंवा दोन्हींसाठी अर्ज
CBSC बोर्डाच्या मते, या नवीन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत पारदर्शकता मिळेल आणि उत्तरपत्रिका पाहून त्यांना कोणत्या प्रश्नासाठी किती गुण मिळाले आणि कुठे चूक झाली, हे समजेल.
काय होती जुनी प्रक्रिया?
याआधी विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी थेट अर्ज करावा लागत होता, नंतर उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी मिळून शेवटी पुनर्मूल्यांकन केलं जात होतं. ही प्रक्रिया अनेक विद्यार्थ्यांसाठी किचकट आणि गोंधळात टाकणारी होती.










