Goa Stampede: लैराई देवी यात्रेत चेंगराचेंगरीमध्ये 7 भाविकांचा मृत्यू, मृतांची यादी आली समोर
गोव्यातील शिरगाव येथील लैराई देवीच्या जत्रेत घडलेल्या भीषण चेंगराचेंगरी प्रकरणासंबंधित आता नवीन वृत्त समोर आलं आहे. यामधील मृत पावलेल्या भाविकांची नावं समोर आली आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

लैराई देवी यात्रेत चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्या भाविकांची यादी

चेंगराचेंगरी प्रकरणात मृतांची संख्या किती?

लैराई देवी यात्रेतील दुर्घटनेत कोणाचा मृत्यू झाला?
Goa Stampede: गोव्यात काल रात्री घडलेल्या भीषण चेंगराचेंगरी प्रकरणासंबंधित आता नवीन वृत्त समोर आलं आहे. गोव्यातील शिरगाव येथील लैराई देवीच्या जत्रेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक भाविक जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मृतांची नावं सुद्धा समोर आली आहेत. जखमी झालेल्या भाविकांमध्ये 20 जणांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पहाटे 3 वाजताच्या सुमारास ही मोठी गुर्घटना घडली. देवी लैराईच्या जत्रेत घडलेल्या या घटनेत मृत पावलेल्या भाविकांमध्ये 4 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश असल्याचं सांगितलं आहे. या दुर्घटनेत थिवी येथील तिघांचा मृत्यू झाला.
चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांची नावं
- सुर्या मयेकर (साखळी)
- आदित्य कवठणकर (वय 17 वर्ष)
- तनुजा कवठणकर (वय 52 वर्ष, अवचीतवाडो थिवी)
- यशवंत केरकर (वय 40 वर्ष, माडेल, थिवी),
- प्रतिभा कळंगुटकर (कुंभारजुवे)
- सागर नंदरगे (वय 30 वर्ष, पिळगाव)
हे ही वाचा: गोव्यात चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी; लइराई देवीच्या जत्रेत नेमकं काय घडलं?
अशी 6 मृतांची नावं आहे. तर आणखी एका मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आदित्य कवठणकर, तनुजा कवठणकर आणि यशवंत केरकर हे तिघेही मृत एकमेकांचे नातेवाईक होते. जे यात्रेसाठी आले होते. मात्र, यात्रेदरम्यान झालेल्या चेंगचेंगरीत त्यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा: 23 वर्षांची शिक्षिका 13 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळाली! प्रेग्नंटही झाली.. म्हणते , 'माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप आहे तो'
खरंतर, जत्रेत सहभागी होण्यासाठी गोव्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक आले होते. गर्दीमुळे अचानक गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाली.
लैराई यात्रा आहे तरी काय?
लैराई देवी ही एक पूजनीय देवी आहे, जी प्रामुख्याने गोव्यात, विशेषतः दक्षिण गोव्यातील शिरोडा गावात पूजा केली जाते. लैराई देवीला समर्पित मंदिर हे स्थानिक लोकांसाठी आणि जवळच्या भागातील भाविकांसाठी एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र आहे.

लैराई देवी 'जत्रा', ज्याला शिरगाव 'जत्रा' म्हणूनही ओळखले जाते, हा गोव्यातील एक प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे, जो दरवर्षी बिचोलिम तालुक्यातील शिरगाव गावात लैराई देवीच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. ही जत्रा हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यात (मार्च-एप्रिल) होते आणि अनेक दिवस चालते. या उत्सवाचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अग्नीवर चालण्याची परंपरा, ज्यामध्ये "धोंड" नावाचे भक्त जळत्या अंगारांवर अनवाणी चालतात. हा विधी त्यांच्या श्रद्धेचे आणि आध्यात्मिक शुद्धतेचे प्रतीक आहे.
या अग्निव्रतापूर्वी, भक्त उपवास करतात, प्रार्थना करतात आणि मानसिक तयारी करतात, जे त्यांचे समर्पण आणि साधना दर्शवते. या उत्सवादरम्यान, देवीची भव्य मिरवणूक काढली जाते, ज्यामध्ये मंत्रोच्चार, ढोल वाजवणे आणि प्रसाद अर्पण करणे यासारख्या परंपरा पार पाडल्या जातात. या धार्मिक विधीत सहभागी होण्यासाठी आणि देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भाविक आणि पर्यटक येतात. शिरगावची जत्रा हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही तर गोव्याच्या अद्वितीय सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करणारा एक भव्य कार्यक्रम आहे.