23 वर्षांची शिक्षिका 13 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळाली! प्रेग्नंटही झाली.. म्हणते , 'माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप आहे तो'
Today Viral News : गुजरातच्या सूरत शहरात 23 वर्षांची एक शिक्षिका तिच्या 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी चार दिवसानंतर या शिक्षिकेला अटक केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

चार दिवसानंतर पोलिसांनी दोघांना पकडलं

मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते

शिक्षिका विद्यार्थ्यासोबत का पळून गेली?
Today Viral News : गुजरातच्या सूरत शहरात 23 वर्षांची एक शिक्षिका तिच्या 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी चार दिवसानंतर या शिक्षिकेला अटक केली. ज्या विद्यार्थ्यासोबत मी पळून गेली होती, त्याच्या मुलाची आई होणार आहे. मी पाच महिन्याची गर्भवती आहे, असं त्या शिक्षिकेनं पोलिसांना सांगितलं. यामुळेच ती शिक्षिका विद्यार्थ्याला घेऊन पळून गेली होती.
शिक्षिकेनं म्हटलं - विद्यार्थीच आहे माझ्या मुलाचा बाप
शाळेतील विद्यार्थ्याने शिक्षिकेसोबत अनेक वेळा शारीरिक संबंध केल्याचं कबूल केलं आहे. याचसोबत विद्यार्थ्याच्या मेडिकल रिपोर्टने समोर आलंय की, तो बाप बनण्यास सक्षम आहे. पोलीस जन्माला येणाऱ्या मुलाचं आणि विद्यार्थ्याचा DNA तपासणार आहेत. पोलिसांनी शिक्षिकेविरोधात अल्पवयीन विद्यार्थ्याचं अपहरण करण्याच्या आरोपाखाली भादवी कलम 137(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसच पोक्सोच्या कलम 4,8,12 अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा >> पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज; बीडच्या पोराला पुण्यात पकडलं, प्रकरण नेमकं काय?
चार दिवसानंतर पोलिसांनी दोघांना पकडलं
सूरतच्या पूना परिसरात 23 वर्षांची शिक्षिका 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत फरार झाली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांचाही तपास सुरु केला होता.अखेर 30 एप्रिलला पोलिसांनी राजस्थानच्या सीमेजवळ असलेल्या एका बसमध्ये दोघांना पकडलं. दोघेही जयपूरहून अहमदाबादला जाण्यासाठी बसमधून प्रवास करत होते.
मागील दोन वर्षांपासून सुरू होते प्रेमसंबंध
पोलिसांच्या तपासात माहिती समोर आली की, मागील दोन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते.एक वर्षांपासून विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध केले होते, असं शिक्षिकेनं कबूल केलं आहे. ती गर्भवती असल्याने विद्यार्थ्यासोबत पळून गेली. विद्यार्थ्यासोबत दुसऱ्या शहरात लपून राहता येईल, असा प्लॅन त्या शिक्षिकेचा होता.