गोव्यात चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी; लैराई देवीच्या जत्रेत नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Goa Lairai Devi Jatra Stampede : घटनेची माहिती मिळताच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय आणि बिचोलिम रुग्णालयाला भेट दिली. या घटनेत जवळपास 30 जण जखमी झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या उपचारांची विचारपूस केली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गोेव्यातील लइराई देवीच्या जत्रेत चेंगराचेंगरी

point

देवीच्या दरबारातच 6 भाविकांनी गमावला जीव

point

नेमकी कशी झाली दुर्घटना?

Goa Lairai Jatra Stamped : गोव्यात आज (3 एप्रिल) पहाटे एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी रात्री गोव्यातील शिरगावमध्ये आयोजित लैराई देवी जत्रेदरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमध्ये 7 जणांचा  मृत्यू झाला. ही दुर्घटना एवढी भीषण आहे की, यामध्ये 50 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तात्काळ गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) आणि म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे ही वाचा >> 23 वर्षांची शिक्षिका 13 वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळाली! प्रेग्नंटही झाली.. म्हणते , 'माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप आहे तो'

शिरगावमध्ये सुरू असलेल्या लैराई जत्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जमले असताना ही दुर्घटना घडली. प्रचंड गर्दी एकत्र आल्यानं एकच गोंधळ उडाला, चेंगराचेंगरी झाली. जखमींपैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. तर इतरांची प्रकृती गंभीर नसून, ते धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती आहे. दरम्यान, जखमींना तातडीने गोवा मेडिकल कॉलेज, नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि बिचोलीम प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. 

चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांची नाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जत्रेत सहभागी होण्यासाठी गोव्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक आले होते. गर्दीमुळे अचानक गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सूर्या मयेकर (साखळी), प्रतिभा कलंगुटकर (कुंभारजुआ), यशवंत केरकर (थिवी), सागर नांदर्गे (पिलीगांव), आदित्य कौठाणकर आणि तनुजा कौठाणकर (दोन्ही थिवी) यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली जखमींची भेट

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची भेट घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या. "शिरगांव येथील लैराई जत्रेतील दुर्घटनेमुळे मी अत्यंत दुखी आहे. जखमींना सर्वतोपरी मदत केली जाईल," असे त्यांनी म्हटले.

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, चेंगराचेंगरीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. दरम्यान, गोवा काँग्रेसने या घटनेचा निषेध करत मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

हे ही वाचा >> दहशतवादी ते भारतासाठी प्राण देणारा काश्मिरी... तुमच्याही डोळ्यात पाणी येईल अशी आहे नझीर वाणीच्या शेवटच्या ऑपरेशनची कहाणी!

काय आहे गोव्यातली प्रसिद्ध लैराई देवी जत्रा?

लैराई देवी ही गोव्यातली एक प्रसिद्ध आहे, हजारो लोकांकडून पूजली जाणारी हिंदू देवी आहे. प्रामुख्यानं गोव्यात, विशेषतः दक्षिण गोव्यातील शिरोडा गावात या देवीचे मोठे भक्त आहेत. लैराई देवीला समर्पित मंदिर हे स्थानिक आणि जवळच्या भागातील भाविकांसाठी एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे या जत्रेला मोठी गर्दी होत असते. श्री लैराई जत्रा ही गोव्यातील प्रमुख धार्मिक उत्सवांपैकी एक आहे, ज्यामध्ये भाविक उपवास करतात आणि अग्नीवर चालण्याचा विधी (फायर-वॉकिंग) करतात.


हे वाचलं का?

    follow whatsapp