Maharashtra Board Result 2025 : दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर! 'या' लिंकवर पाहता येणार रिझल्ट
SSC And HSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (MSBSHSE) लवकरच दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल 2025 घोषित केला जाणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार?

शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना केलं मोठं आवाहन

कोणत्या वेबसाईट्सवर निकाल पाहू शकता?
SSC And HSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून (MSBSHSE) लवकरच दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल 2025 घोषित केला जाणार आहे. जवळपास 30 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. यावर्षी दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च आणि बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी पासून 18 मार्चपर्यंत पार पडली. दरम्यान, या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahahssboard.in आणि https://mahresult.nic.in/ वर आपली प्रोव्हिजनल मार्कशीट चेक करू शकतात. याशिवाय mumbaitak.in वरही निकालाची डायरेक्ट लिंक उपलब्ध होईल.
महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागेल?
ताज्या अपडेटनुसार, बोर्डाकडून मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्ड 10 वी (एसएससी) रिझल्ट आणि महाराष्ट्र बोर्ड 12 वी (एचएचसी) रिझल्ट जाहीर केला जाऊ शकतो. मागील वर्षी एसएससी बोर्ड रिझल्ट 27 मे 2024 ला घोषित केला होता. वर्ष 2019 मध्ये 8 जून, 2020 मध्ये 29 जुलै, 2021 मध्ये 16 जुलै, 2022 मध्ये 17 जून आणि 2023 मध्ये 2 जूनला महाराष्ट्र बोर्ड एसएससीचा निकाल
घोषित करण्यात आला होता. बोर्डाकडून लवकरच निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली जाणार आहे.
हे ही वाचा >> 'हा बघा कोयता गँगचा कालचा थरार..' रोहित पवारांनी थेट दाखवला Video, काका अजित पवारांना घेरलं
बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण पाहिजेत?
दहावीप्रमाणेच बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात कमीत कमी 35 टक्के गुण मिळाले पाहिजेत. दोन्ही इयत्तेचा पासिंग क्रायटेरिया एकसारखाच आहे. प्रत्येक विषयाला 100 गुण असतात. यामध्ये थेअरी 80 गुण आणि प्रक्टिकल/इंटरनल असेसमेंट 20 गुणांची असते. पास होण्यासाठी 100 पैकी कमीत कमी 35 टक्क्यांची आवश्यकता असते. म्हणजेच 80 गुणांच्या थेअरी पेपरमध्ये 28 गुण आणि प्रक्टिकलमध्ये आवश्यक मार्क्स मिळवून पास होण्याची गरज असते.
हे ही वाचा >> Job Vacancy: Union Bank of India बँकेत बंपर भर्ती, असा करा अर्ज!
निकाल जाहीर झाल्यानंतर काय कराल?
निकाल घोषित केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांची गुणपत्रिका तपासली पाहिजे. मेन मार्कशिट शाळेतून काही दिवसानंतर दिली जाते. निकालाबाबत तुम्हाला काही शंका असल्यास तुम्ही गुणांच्या फेरमोजणीसाठी अर्ज करू शकता. अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी जुलै 2025 मध्ये सप्लीमेन्ट्री परीक्षा देऊ शकतात. विद्यार्थ्यांनी फक्त अधिकृत वेबसाईटवर विश्वास ठेवावा, असं बोर्डाकडून सांगण्यात आलंय.