Maharashtra SSC, HSC Result 2025 Date and Time: 10 वी आणि 12 वी बोर्डाचा निकाल 'या' तारखेला लागणार; 'इथे' पाहा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, 10 वी आणि 12 वीचा निकाल 5 मे 2025 रोजी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर घोषिक करण्यात येईल.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

10 वी आणि 12 वी बोर्डाचा निकाल 'या' तारखेला लागणार

कसा आणि कुठे पाहाल निकाल

ऑनलाइन निकाल पाहण्याची नेमकी प्रक्रिया काय?
Maharashtra SSC, HSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, 10 वी आणि 12 वीचा निकाल 5 मे 2025 रोजी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर घोषिक करण्यात येईल. बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या पत्रकार परिषदेनंतर निकाल mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले जातील.
वेबसाइटवर ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेचं हॉल तिकीट आणि लॉगिन करण्यासाठी आवश्यक डिटेल्स जसे की रोल नंबर आणि आईचं नाव तयार ठेवणं अनिवार्य आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या निकालासंबंधित अपडेट्स साठी mahahsscboard.in या अधिकृत MSBSHSE वेबसाइटला फॉलो करा.
10 वी आणि 12 वीच्या निकालाची तारीख आणि वेळ
महाराष्ट्र बोर्डाने 2025 सालातील 10 वी आणि 12 वीच्या निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. MSBSHSE महाराष्ट्र बोर्डाचे 10 वी (SSC) आणि 12 वी (HSC) निकाल 5 मे 2025 रोजी mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर घोषित होईल. विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या निकाल पोर्टलमध्ये त्यांचे लॉग इन डिटेल्स भरावे लागतील.
विद्यार्थी SSC आणि HSC चा निकाल खालील लिंकवर जाऊन तपासू शकतात.
- mahresult.nic.in
- mahahsscboard.in
Maha Result 2025 वर लॉगिन करण्याची प्रक्रिया
महाराष्ट्र बोर्डाचे निकाल mahresult.nic.in या SSC आणि HSC चा निकाल वेबसाइटवर प्रदर्शित केले जातील. ऑनलाइन बेवसाइटवर निकाल पाहण्यासाठी खालील प्रक्रिया फॉलो करा.
1. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत निकाल पोर्टल mahresult.nic.in ला भेट द्या.
2. SSC/HSC निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
3. दहावी आणि बारावी परीक्षेतील रोल नंबर आणि विद्यार्थ्यांच्या आईचे पहिले नाव वापरून लॉगिन करा.
4. 2025 मधील तुमचा महाराष्ट्र बोर्डाचा निकाल प्रदर्शित होईल.
5. तुमचा निकाल व्यवस्थित तपासा.
6. महाराष्ट्र बोर्डाच्या 10 वी आणि 12 वीच्या निकालाच्या मार्कशीट्स डाउनलोड करा.
7. यानंतर, काही दिवसांनंतर विद्यार्थ्यांची त्यांच्या शाळेतून अधिकृत मार्कशीट्स प्राप्त करावी लागतील.
mahresult.nic.in Results: मागील वर्षाच्या निकालांची तारीख
या वर्षी म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी, MSBSHSE 5 मे 2025 रोजी दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करेल. अशात, मागील वर्षाच्या निकालांची तारीख पाहूया:
इयत्ता | वर्ष | तारीख |
HSE (12 वी) | 2025 | 5 मे |
SSC (10 वी) | 2025 | 5 मे |
HSE (12 वी) | 2024 | 21 मे |
SSC (10 वी) | 2024 | 27 मे |