तरुण सीमा हैदरच्या घरात घुसला अन् झाला मोठा कांड, पोलिसांना म्हणाला, "माझ्यावर काळी जादू..."

मुंबई तक

Seema Haider Viral News : सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या लव्ह स्टोरीच्या चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगल्यात. अशातच गुजरातचा एक तरुण सीमा हैदरच्या घरात घुसल्याने एकच खळबळ माजली आहे

ADVERTISEMENT

Seema Haider Viral News
Seema Haider Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गुजरातचा तरुणी सीमा हैदरच्या घरात का घुसला?

point

पोलिसांनी तरुणाला केली अटक

point

सीमा हैदरची लव्ह स्टोरी इंटरनेटवर होतेय तुफान व्हायरल

Seema Haider Viral News : सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या लव्ह स्टोरीच्या चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगल्यात. अशातच गुजरातचा एक तरुण सीमा हैदरच्या घरात घुसल्याने एकच खळबळ माजली आहे. या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. सीमा आणि सचिनने काळी जादू केली, असा आरोप या तरुणाने त्यांच्यावर केला आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. 

गुजरातचा तेजस झानी सीमा हैदरच्या घरात घुसला आणि..

रबूपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या सीमा हैदर आणि सचिन मीनाच्या घरात एक अज्ञात तरुण घुसला. त्यानंतर सीमा हैदर आणि सचिनने या घटनेबद्दल पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर नोएडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणाला पकडलं. मिळालेल्या माहितीनुसार, सीमा हैदरच्या घरात घुसणारा तरुण गुजरातचा रहिवासी आहे. तेजस झानी असं त्या तरुणाचं नाव आहे. तपसादरम्यान, तेजसने खळबळजनक दावा केला आहे.

हे ही वाचा >>  CRPF जवानाचं पाकिस्तानी महिलेशी लग्न, माहिती लपवल्याच्या आरोपाखाली पदावरुन बडतर्फ, जवान म्हणाला, मी...

"सीमा हैदर आणि सचिनने त्याच्यावर काळी जादू केली आहे. त्यामुळे मी सीमा हैदरच्या प्रेमात पडला. म्हणून मी स्वत:ला रोखू शकलो नाही आणि सीमा हैदरच्या घरी गेलो. मी पूर्णपणे काळी जादूच्या प्रभावात आहे आणि सीमा हैदरच्या प्रेमात पडलो आहे", असं आरोपी तेजसने म्हटलं आहे. तेजस मानसिकदृष्ट्या ठीक नाहीय. पोलिसांकडून तेजसची चौकशी केली जात आहे. त्याच्या गुन्हेगारी रेकॉर्डही तपासला जात आहे. 

पाकिस्तानमधून आलेल्या सीमा हैदरची इंटरनेटवर तुफान चर्चा रंगली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले होते. त्यानंतर सीमा हैदरचे वकील एपी सिंग यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, सीमाच्या मुलीचा जन्मदाखला उत्तर प्रदेश सरकारने जारी केला आहे. त्यामुळे सीमा आता भारताची नागरिक झाली आहे. सीमाने पाकिस्तानमध्ये राहत असताना हिंदू धर्माचा स्वीकार केला होता. त्यानंतर नेपाळ आणि भारत दोन्ही ठिकाणी हिंदू परंपरेनुसार, भारतीय नागरिक सचिन मीनाशी लग्न केलं. 

हे ही वाचा >> माय लेकीनं मिळून मयूरला गुंगीचं औषध दिलं, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहच पेटवला अन्... 

हे वाचलं का?

    follow whatsapp