माय लेकीनं मिळून मयूरला गुंगीचं औषध दिलं, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहच पेटवला अन्... 

मुंबई तक

Sangli Crime News : सांगलीतील तासगावात मुलीने जन्मदात्या आईची मदत घेत भावाची हत्या केली. या हत्येनंतर तिने पुरावा नष्ट करणयासाठी मृतदेहाला आग लावली. माय लेकीने आरडोओरड केल्याचा संतापजनक प्रकार आता समोर आला आहे. या प्रकरणात तासगाव पोलिसांनी लक्ष्य घालत सत्य समोर आणलं. या घटनेनं तासगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

ADVERTISEMENT

सांगलीतील तासगावात मुलीने जन्मदात्या आईची मदत घेत भावाची हत्या
सांगलीतील तासगावात मुलीने जन्मदात्या आईची मदत घेत भावाची केली हत्या
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी उलट तपासणी करण्यास सुरूवात

point

तासगाव शहरातील कासार गल्लीतील रहिवासी आहे मयुर

Sangli Crime News : सांगलीतील तासगावात मुलीने जन्मदात्या आईची मदत घेत भावाची हत्या केली. या हत्येनंतर तिने पुरावा नष्ट करणयासाठी मृतदेहाला आग लावली. माय लेकीने आरडोओरड केल्याचा संतापजनक प्रकार आता समोर आला आहे. या प्रकरणात तासगाव पोलिसांनी लक्ष्य घालत सत्य समोर आणलं. या घटनेनं तासगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

तासगाव शहरात वास्तव्यास असणारा तरुण मयुर रामचंद्र माळी (वय30) या तरुणाला त्याची आई संगीता रामचंद्र माळी (वय 50) आणि बहीण काजल माळी (वय19) या दोघींनी मयुरला गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर माय लेकीने मिळून मयुरच्या डोक्यात दगड घालत त्याची निर्घृण हत्या केली. त्यानंतर माय लेकीनं  पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला. 

हेही वाचा : कपलला अडवलं, खोट्या केसची धमकी देत लाच मागितली, पुढे असं काय घडलं की तीन पोलिसांनाच निलिंबित केलं?

संबंधित प्रकरणात पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी उलट तपासणी करण्यास सुरूवात केली. तपासादरम्यान, ही हत्या माय लेकीने मिळून केली असल्याची घटना उघडकीस आली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp