CRPF जवानाचं पाकिस्तानी महिलेशी लग्न, माहिती लपवल्याच्या आरोपाखाली पदावरुन बडतर्फ, जवान म्हणाला, मी...

मुंबई तक

सीआरपीएफच्या म्हणण्यानुसार, अहमद यांनी पाकिस्तानी नागरिकाशी लग्नाची माहिती लपवली आणि तिला व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात राहू दिलं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

CRPF जवान थेट सेवेतून बडतर्फ

point

पाकिस्तानी महिलेशी केलं होतं लग्न

point

माहिती लपवून महिलेला इथेच ठेवल्याचा आरोप

केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) जवान मुनीर अहमद यांना पाकिस्तानी महिलेशी केलेलं लग्न लपवल्याच्या आरोपाखाली सेवेतून बर्खास्त करण्यात आलं आहे. मात्र, मुनीर यांनी हे आरोप फेटाळले असून, लग्नापूर्वी सीआरपीएफ मुख्यालयाकडून परवानगी घेतल्याचा दावा केला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना मुनीर म्हणाले, “मला माझ्या बर्खास्तगीची माहिती माध्यमांद्वारे समजली. 

हे ही वाचा >> ऊन, वारा, पाऊस, दिवस, रात्र... प्रत्येक परिस्थिती ठेवणार करडी नजर, भारत 'ही' एयर डिफेन्स सिस्टिम खरेदी करणार

त्यानंतर लगेचच सीआरपीएफकडून मला पत्र मिळालं, ज्यात माझ्यावरची कारवाई झाल्याचं सांगण्यात आलं. हे पत्र माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी धक्कादायक होतं. पण, मी पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी मुख्यालयाकडे परवानगी मागितली होती आणि मला ती मिळाली होती. त्यानंतरच मी लग्न केलं असं त्यांनी सांगितलं.”

सीआरपीएफने आरोप केला की, अहमद यांनी जाणीवपूर्वक त्या महिलेला तिच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात राहण्यास मदत केली. यावर मुनीर यांनी सांगितलं की, ते आता या कारवाईला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी करत आहेत.

जम्मूच्या घरोटा भागातील रहिवासी असलेले मुनीर अहमद एप्रिल 2017 मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाले होते. त्यांची पाकिस्तानी नागरिक मीनल खान यांच्याशी ऑनलाइन मैत्री झाली. 24 मे 2024 रोजी व्हिडिओ कॉलद्वारे निकाह समारंभात त्यांनी लग्न केलं. अहमद यांच्या म्हणण्यानुसार, सीआरपीएफ मुख्यालयाकडून औपचारिक परवानगी मिळाल्यानंतर सुमारे एका महिन्याने हे लग्न पार पडलं. त्यांनी 31 डिसेंबर 2022 रोजी प्रथम सीआरपीएफला मीनल खान यांच्याशी लग्न करण्याच्या आपल्या इराद्याची माहिती दिली होती. “मी स्वतःच, माझ्या पालकांचं, स्थानिक सरपंच आणि जिल्हा विकास परिषद सदस्यांचं शपथपत्रांसह सर्व आवश्यक कागदपत्रे अधिकृत मार्गाने सादर केली होती. त्यानंतर 30 एप्रिल 2024 रोजी मला मुख्यालयाकडून परवानगी मिळाली,” असे अहमद यांनी सांगितले.

हे ही वाचा >> कपलला अडवलं, खोट्या केसची धमकी देत लाच मागितली, पुढे असं काय घडलं की तीन पोलिसांनाच निलिंबित केलं?

सीआरपीएफच्या म्हणण्यानुसार, अहमद यांनी पाकिस्तानी नागरिकाशी लग्नाची माहिती लपवली आणि तिला व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात राहू दिलं. त्यामुळे सेवा आचरण नियमांचं उल्लंघन झालं आहे. तसंच राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे.
मीनल खान 28 फेब्रुवारी रोजी वाघा-अटारी सीमेमार्गे अल्पकालीन व्हिसावर भारतात आल्या होत्या. त्यांच्या व्हिसाची मुदत 22 मार्च रोजी संपली. मात्र, त्यांनी आणि अहमद यांनी मार्चमध्ये दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज केला. मुलाखतीसह आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर जम्मू-कश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाने त्यांच्या निर्वासनावर स्थगिती दिली होती.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp