पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचं होणार आगमन! कोणत्या जिल्ह्यात उष्णता वाढणार?

मुंबई तक

Maharashtra Weather Today : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवमानात मोठे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather Today (फोटो- GROK AI)
Maharashtra Weather Today (फोटो- GROK AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात कोणत्या जिल्ह्यात उसळणार उष्णतेची लाट?

point

कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस ?

point

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कसं असेल आजचं हवामान?

Maharashtra Weather Today : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवमानात मोठे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल 4 मे रोजी प्रादेशिक हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, पुणे घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसरात हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज बांधण्यात आला होता.

तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला होता. तर धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगरमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या आणि मध्यम पावसाची शक्यता वर्तवली होती. अशातच आज सोमवारी 5 मे 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामानाची स्थिती कशी असणार आहे,  जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये तुरळक ठिकाणी विजाच्या कडकडाटासह वादळे,  हलका ते मध्यम पाऊस, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर,  सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो.

हे ही वाचा >> Maharashtra Board HSC Results 2025 : सर्वात मोठी अपडेट! बारावीच्या निकालाची तारीख आली समोर, निकाल कुठे पाहाल?

धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, छत्रपती संभाजी नगर, जालना. बीड, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळमध्ये 40-50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहू शकतो. तर भंडारा, गोंदियात (50-60 किमी प्रतितास) वेगाने वादळी वारे धडकणार आहेत. तर अकोल, अमरावती, बुलढाणा, वाशिममध्ये हवामान विभागाकडून कोणताही इशारा देण्यात आला नाही.

दरम्यान, रविवारी धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगरमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, हलका ते मध्यम पावसासह सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेगाने) येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली होती. 

हे ही वाचा >> भरधाव मर्सिडीजने दुचाकीला उडवलं, 23 वर्षीय कुणाल जागीच ठार, एक जण जखमी; कारमध्ये कोण कोण होतं?

हे वाचलं का?

    follow whatsapp