Sidharth Shukla: अभिनेता सिद्धार्थ शुक्ला अनंतात विलीन!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: बिग बॉस 13 विजेता आणि टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth shukla) काल (2 सप्टेंबर) निधन झालं होतं. आज (3 सप्टेंबर) त्याच्यावर मुंबईतील ओशिवरा स्मशान भूमीवर अंत्यसंस्कार पार पडले आहेत. ब्रह्मकुमारी प्रथेनुसार हे सगळे विधी पार पडले. शेवटी त्याला मुखाग्नी देण्यात आला आणि सिद्धार्थ पंचतत्वात विलीन झाला. हा त्याच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत भावूक असा क्षण होता. कारण सिद्धार्थ हा त्यांच्या घरातील शेंडेफळ होता.

ADVERTISEMENT

सिद्धार्थच्या निधनाने त्याच्या कुटुंबीयांना फार मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू झाले तेव्हा त्याच्या आईला तिथेच रडू कोसळलं, आवेग न आवरता आल्याने त्या भाविनकदृष्ट्या कोलमडून गेल्या आहेत.

सिद्धार्थच्या पार्थिवावर ब्रह्मकुमारी प्रथेनुसार हे अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले आहेत. मुंबईतील ओशिवारा स्मशानभूमीत हे अंत्यसंस्कार पार पडले आहेत. दरम्यान, कोरोनाचं संकट लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी सिद्धार्थचे कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक आणि काही मित्र-मंडळी यांनाच स्मशानाभूमीमध्ये जाण्यास परवानगी दिली होती.

हे वाचलं का?

असं असताना त्याचे अनेक चाहते हे अनेक तास स्मशानभूमीबाहेरच थांबले होते. सिद्धार्थच्या पार्थिवाचं शेवटचं दर्शन आपल्याला होईल या आशेने ते सगळे स्मशानभूमीबाहेर प्रचंड पावसात थांबून राहिले होते. पण कोव्हिड प्रोटोकॉल लक्षात घेऊन पोलिसांनी कोणालाही आत सोडलं नाही. त्यामुळे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत सिद्धार्थवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सिद्धार्थची अंत्ययात्रा थेट रुग्णालयातूनच काढण्यात आली

ADVERTISEMENT

सिद्धार्थला सुरुवातीला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आलं होतं. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान, त्यानंतर त्याचं पोस्टमार्टम करण्यात आलं. त्यानंतर आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. मात्र, त्याच्या अंत्ययात्रेला थेट रुग्णालयातूनच सुरुवात करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, मुंबई पोलीस कूपर हॉस्पिटल ते ओशिवरा स्मशानभूमीपर्यंत रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस व्हॅन कूपर हॉस्पिटलमध्ये पोहोचली असून आणि थोड्याच वेळात सिद्धार्थ शुक्लाची अंत्ययात्रा सुरु होणार आहे. त्यासाठीच हा संपूर्ण परिसर मोकळा केला जात आहे. जेणेकरून त्याच्या अंत्ययात्रेत कोणताही अडथळा येणार नाही.

सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्ययात्रेला सुरुवात:

  • सिद्धार्थवर अंत्यसंस्कार सुरु होताच त्याच्या आई आणि बहिणीला शोक अनावर

  • ब्रह्मकुमारी प्रथेनुसार सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यसंस्कारांना सुरुवात

  • ब्रह्मकुमारी प्रथेनुसार सिद्धार्थ शुक्लावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

  • सिद्धार्थचा पार्थिव देह ओशिवरा स्मशानभूमीत पोहचलं.

  • सिद्धार्थचं अंत्य दर्शन घेण्यासाठी चाहत्यांनी बरीच गर्दी केली आहे.

  • कूपर रुग्णालयातून सिद्धार्थचं पार्थिव थेट ओशिवरा स्मशानभूमीत नेण्यात येत आहे.

  • सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्य यात्रेला कूपर रुग्णालयातूनच सुरुवात करण्यात आली

सुरुवातीला असं सागंण्यात येत होतं की, सिद्धार्थ शुक्लाचा मृतदेह हा सर्वात आधी त्याचा घरी नेण्यात येईल आणि त्यानंतर तिथून त्याच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. पण एकूण चाहत्यांची गर्दी लक्षात घेता आणि कोव्हिड प्रोटोकॉल या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन एका रुग्णवाहिकेतून सिद्धार्थची अंत्ययात्रा थेट कूपर रुग्णालयातून निघणार आहे. दरम्यान, अनेक सेलिब्रिटी हे ओशिवरा स्मशानभूमी आणि सिद्धार्थ शुक्लाच्या घरी घराजवळ उपस्थित आहेत.

कूपर रुग्णालयाबाहेर त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रत्येकाला सिद्धार्थ शुक्लाला शेवटचा निरोप घ्यायचा आहे. त्यामुळेच त्यांनी इथे गर्दी केली होती. दरम्यान, अभिनेताच्या मृत्यूबाबत सिद्धार्थच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेलं नाही.

ब्रह्मकुमारी रीतिरिवाजानुसार होणार अंत्यसंस्कार

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रह्मकुमारी रीतिरिवाजानुसार सिद्धार्थवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ब्रह्मकुमारी आश्रमाचे सदस्य हे सिद्धार्थ शुक्लाचे अंत्यसंस्कार करणार आहेत. सिद्धार्थ शुक्लाच्या आत्म्याच्या शांतीसाठी अंत्यविधीदरम्यान मेडिटेशन देखील करण्यात येणार आहे.

सिद्धार्थ शुक्लाचा प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर

सिद्धार्थ शुक्ला याचं काल (2 सप्टेंबर) रोजी निधन झालं होतं. त्यानंतर त्याच्यावर कूपर रुग्णालयात पोस्टमार्टम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. थोड्याच वेळापूर्वी त्याचा प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. ज्यामध्ये डॉक्टरांनी आपलं काहीही मत व्यक्त केलेलं नाही. हिस्टोपॅथोलॉजी स्टडी आणि केमिकल अॅनालिसेसद्वारे त्याचा मृत्यूचं नेमकं काय कारण काय होतं हे तपासलं जात आहे. सिद्धार्थचं व्हिसरा देखील सुरक्षित ठेवण्यात आलं आहे. ते देखील तपासले जाणार आहे. त्यानंतरच डॉक्टर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण सांगू शकतील.

Sidharth Shukla Death: सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर!

सिद्धार्थ शुक्लाच्या प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्टमधील नेमकी माहिती काय?

  • पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी कोणतेही मत दिलेले नाही.

  • सर्व अहवाल प्रलंबित आहेत आणि सध्या तरी डॉक्टरांनी कोणताही निष्कर्ष काढलेला नाही.

  • सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमॉर्टमबाबत डॉक्टरांनी कोणतेही मत दिलेले नाही.

  • सिद्धार्थचे व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.

  • हिस्टोपॅथोलॉजी स्टडी आणि केमिकल अॅनालिसेसद्वारा (Chemical Analysis) त्याचा मृत्यूचं नेमकं काय कारण होतं हे तपासलं जाईल.

  • पोस्टमॉर्टम अहवालात सिद्धार्थच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा नव्हत्या किंवा अंतर्गत जखमा आढळून आलेल्या नसल्याचं नमूद केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT