कल्याणमधल्या गौरीपाडा तलावाच्या किनारी मृत कासवांचा खच, घटनेने खळबळ
मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, कल्याण कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा तलावाच्या किनारी आज असंख्य कासवं मृतावस्थेत पडलेले मिळून आले. कासवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. कल्याण पश्चिमेला असलेल्या भव्य गौरीपाडा तलावाचे काही वर्षापूर्वी सुशोभिकरण करण्यात आले होते. या तलावात स्थानिक लोक मासेमारीही करतात. दोन दिवसापूर्वी काही कासवं मेलेल्या स्थितीत आढळून आले होते. […]
ADVERTISEMENT
मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, कल्याण
ADVERTISEMENT
कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा तलावाच्या किनारी आज असंख्य कासवं मृतावस्थेत पडलेले मिळून आले. कासवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.
कल्याण पश्चिमेला असलेल्या भव्य गौरीपाडा तलावाचे काही वर्षापूर्वी सुशोभिकरण करण्यात आले होते. या तलावात स्थानिक लोक मासेमारीही करतात. दोन दिवसापूर्वी काही कासवं मेलेल्या स्थितीत आढळून आले होते. आज मात्र तलावाच्या किनारी असंख्य कासवं मृतावस्थेत पडलेले दिसून आले. हा प्रकार स्थानिकांच्या निदर्शनास आला.
हे वाचलं का?
या ठिकाणी भाजपचे माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी धाव घेतली. या घटनेची माहीती गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनासह प्रदूषण नियंत्रण मंडळास दिली आहे. कासवांचा इतक्या मोठय़ा प्रमाणात मृत्यू झाल्याची बाब धक्कादायक आणि गंभीर आहे. काही कासवांनी मात्र तलावाच्या बाजूला असलेल्या गवताचा आसरा घेतला होता.
घोळ माशांमुळे मच्छिमारांचं नशिब पालटलं, १५७ मासे जाळ्यात, सव्वा कोटींची कमाई
ADVERTISEMENT
तलावात मासेमारी करताना माशांना काही खायला टाकण्यात आले असावे. तेच खाद्य कासवांनीही खाल्ले असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तलावाच्या पाण्यात काही मिसळले गेले असल्याने प्रदूषित पाण्यामुळे कासवांचा मृत्यू झाला असावा अशा विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. कासव हा उभयचर आणि दीर्घायुष्यी आहे. त्याचा अशा प्रकारे मृत्यू होणो ही गंभीर बाब आहे. काही ग्रामस्थांनी मृतावस्थेत पडलेले नेमकी किती कासव आहे. याची मोजणी केली असता त्यांनी सांगितले की, किमान ८५ कासवं मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले होते.
ADVERTISEMENT
प्रभाग क्रमांक पाच या ठिकाणी या सुशोभीकरण केलेला तलाव आहे. या तलावात मासेमारीही चालते मात्र आमच्या निदर्शनास आज आलं आहे की या ठिकाणी शेकडो कासवांचा मृत्यू झाला आहे. त्याची माहिती आम्ही महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांनाही दिली आहे. तलावात कासवं शिल्लक राहिली पाहिजेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर कासवांचा मृत्यू कसा काय झाला? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी भाजपचे नगरसेवक दया गायकवाड यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT