ज्या विहिरीत मिळाला चिमुकल्याचा मृतदेह, दुसऱ्या दिवशी तिथेच सापडला पित्याचा मृतदेह

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जका खान, वाशिम

ADVERTISEMENT

ज्या विहिरीत एका ९ वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला, त्याच विहिरीत दुसऱ्या दिवशी चिमुकल्याच्या पित्याचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. वाशिम जिल्ह्यातील सेलू बाजार गावात ही घटना घडली आहे.

१३ फेब्रुवारी रोजी एका ९ वर्षाच्या बालकाचा विहिरीत मृतदेह सापडला. चिमुकल्याचा मृतदेह मिळाल्यानंतर २४ तास लोटत नाही, तोच त्याच विहिरीत मयत बालकाच्या पित्याचा मृतदेह आढळून आला. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

हे वाचलं का?

पोलीस अधिकारी सुनील हूड यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. पित्याने आधी ९ वर्षाच्या बालकाला विहिरीत फेकलं आणि त्यानंतर स्वतः विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मयत बालकाचा पित्याला व्यसन जडलेलं होतं. त्यामुळे पत्नी आणि मयत व्यक्तीमध्ये सातत्याने वाद होत होते. त्याच्या व्यसनाधीनतेमुळे पत्नी मयत व्यक्तीला सोडूनही गेली होती. मात्र, कुटुंबांनी समजूत काढल्यानंतर परत आली होती. मयत व्यक्ती मजूरी करायचा.

दरम्यान, मृतदेह आढळून येण्याच्या एक दिवस आधी मयत व्यक्तीच्या पत्नीने पोलिसांत बापलेक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पती मुलाला घेऊन निघून गेला असल्याचं महिलेनं तक्रारीत म्हटलं होतं. बालकाचा आणि पित्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर मंगरुळपीर पोलिसांनी या प्रकरणी बालकाच्या हत्येप्रकरणी मयत पित्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT