Sanjay Raut यांचं ते वक्तव्य काँग्रेसला झोंबलं, मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती
शिवसेना खासदार संजय राऊत यांचं एक वक्तव्य हे काँग्रेसला चांगलंच झोंबलं आहे असं दिसून येतं आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसच्या नेत्यांची जी बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी संजय राऊत यांच्या त्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाने यूपीएच्या अध्यक्षपदाचा हट्ट सोडला नाही तर मग राष्ट्रीय स्तरावरचे नेते यूपीए २ […]
ADVERTISEMENT
शिवसेना खासदार संजय राऊत यांचं एक वक्तव्य हे काँग्रेसला चांगलंच झोंबलं आहे असं दिसून येतं आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेसच्या नेत्यांची जी बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी संजय राऊत यांच्या त्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेस पक्षाने यूपीएच्या अध्यक्षपदाचा हट्ट सोडला नाही तर मग राष्ट्रीय स्तरावरचे नेते यूपीए २ स्थापन करण्याची तयारी करत आहेत. हा निश्चित चिंतेचा विषय आहे त्यामुळे यूपीएचं अध्यक्षपद शरद पवार यांना दिलं गेलं पाहिजे. असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. यानंतर राज्य स्तरावर संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबाबत नाराजीही व्यक्त झाली होती. आता हीच नाराजी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.
संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते झाले आहेत: नाना पटोले
हे वाचलं का?
काँग्रेस पक्षाने यूपीएच्या अध्यक्षपदाचा हट्ट सोडला नाही तर मग राष्ट्रीय स्तरावरचे नेते यूपीए २ स्थापन करण्याची तयारी करत आहेत. हा निश्चित चिंतेचा विषय आहे त्यामुळे यूपीएचं अध्यक्षपद शरद पवार यांना दिलं गेलं पाहिजे
संजय राऊत, खासदार शिवसेना
संजय राऊत यांनी हे वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली होती.
ADVERTISEMENT
काय म्हणाले होते नाना पटोले?
ADVERTISEMENT
‘खासदार संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते झाले आहेत. ते शिवसेनेचे खासदार किंवा प्रवक्ते राहिलेले नाहीत. कारण ते सातत्याने अशा प्रकारचं वक्तव्य कत आहेत. कारण शिवसेना ही यूपीएची सदस्य नाही. जर शिवसेना यूपीएची सदस्य नाही तर त्या पद्धतीचं वक्तव्य करण्याचा अधिकार त्यांना नाही असं माझं मत आहे. मात्र संजय राऊत अजूनही त्याच पद्धतीने बोलत आहेत.’
देवेंद्र फडणवीस यांनीही केली टोलेबाजी
‘यूपीएचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी म्हणतोय. सोळाव्या गडीच्या म्हणण्याने कोण कॅप्टन होणार हे ठरत नसतं. त्याकरता टीममध्ये असावं लागतं. टीमच्या बाहेरच्या माणसाने ते म्हणून काही फायदा नसतो.’ असं म्हणत फडणवीसांनी संजय राऊत यांच्या मागणीची खिल्ली उडवली
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT