पोलीस अधिक्षकांनाच कायदा-सुव्यवस्था बिघडवायची आहे – दापोलीत निलेश राणेंचा गंभीर आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील कथित रिसॉर्टवर कारवाईसाठी गेलेल्या भाजप नेत्यांनी ताब्यात घेतलं आहे. किरीट सोमय्या आणि निलेश राणेंना रिसॉर्टवर जाऊ न देता पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवलं. यामुळे दापोलीत वातावरण चांगलंच तापलेलं पहायला मिळालं. भाजप नेते निलेश राणे यांनी रत्नागिरीचे पोलीस अधिकक्षक मोहीतकुमार गर्ग यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनाच इथली कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडवायची असल्याचा आरोप केला.

ADVERTISEMENT

“किरीट सोमय्या आणि मी गेल्या दोन तासांपासून पोलीस स्टेशनमध्ये बसलो आहे. इथले पोलीस अधिक्षक गर्ग यांना आम्ही, आम्हाला तक्रार दाखल करायची असल्याचं सांगितलं. ही तक्रार कशाची आहे तर दापोलीत अनिल परबांच्या अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई करण्यासाठी…तुम्हाला आमची तक्रार घ्यावी लागेल एवढंच आमचं म्हणणं आहे. परंतू पोलीस अधिक्षक आम्हाला भेटायलाच तयार नाहीयेत. ते कुठे व्यस्त आहेत मला माहिती नाही.”

पोलीस अधिक्षकांना अनिल परबांविरोधात FIR दाखल करुन घ्यायची नाहीये, त्यांना आमच्याविरुद्ध तक्रार दाखल करायची आहे असं वाटतंय. नेमक्या कोणाच्या दबावाखाली ते काम करतायत मला माहिती नाही. माझा थेट आरोप आहे की पोलीस अधिक्षकांना इथली कायदा-सुव्यवस्था बिघडवायची आहे असं निलेश राणे म्हणाले.

हे वाचलं का?

विरोधी गटातील लोकांना खुलेआम फिरण्याची मुभा दिली जात आहे. किरीट सोमय्यांसारख्या माजी खासदाराला दोन तास झाले त्यांनी ताब्यात घेतलं आहे. यामागचं कारणंही माहिती नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही असं राणेंनी स्पष्ट केलं.

आम्हाला अडवणं ठाकरेंना बापजन्मात जमणार नाही – निलेश राणेंनी शिवसेनेला डिवचलं

ADVERTISEMENT

अनिल परब यांच्या रिसॉर्टवर जाऊन कारवाई करण्यावर ठाम असलेल्या किरीट सोमय्यांनीही पोलीसांवर निशाणा साधला. किरीट सोमय्यांच्या जिवाला धोका असल्याचं कारण देत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. याविरोधात ठिय्या आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांनी पोलिसांनी, मला धमकी देणाऱ्यांवर तुम्ही कारवाई का केली नाही असा प्रश्न विचारला. पोलिसांनी इथे बोर्ड लावावा की शिवसेना पोलीस शाखा…लाज वाटायला हवी तुम्हाला. माझी जर गनिमी काव्याने हत्या केली जाऊ शकते मग तुम्ही धमकी देणाऱ्यांना अटक का केली नाही असं म्हणत सोमय्यांनी पोलिसांवरही ताशेरे ओढले.

ADVERTISEMENT

हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा – अनिल परबांचं किरीट सोमय्यांना आव्हान

पोलीस आम्हाला मूर्ख बनवत आहेत. अनिल परबविरोधात ते FIR का दाखल करत नाहीत? असा प्रश्न विचारत सोमय्यांनी आपण रिसॉर्टवर जाण्याबद्दल ठाम असल्याचं सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT