SSC Result 2021 : दहावीच्या निकालासंदर्भात mahresult.nic.in वर कोणतीच अपडेट नाही

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे SSC निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार निकाल 15 जुलै रोजी म्हणजेच आज जाहीर होणार नाही. कारण याबाबत आत्तापर्यंत mahresult.nic.in वर कोणतीही अपडेट नाही. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितल्यानुसार एसएससीचा निकाल 2020 ची तारीख 15 जुलै 2021 ही असणार होती. मात्र यासंदर्भात कोणतीही अपडेट अद्याप आलेली नाही. त्यामुळे शिक्षण मंडळाच्या काही सूत्रांच्या माहितीनुसार या आठवड्याच्या अखेरीस निकाल जाहीर होऊ शकतो. तर महिना अखेरही लागू शकते अशा दोन शक्यता असल्याने विद्यार्थी आणि पालक यांच्यात काहीसं संभ्रमाचं वातावरण आहे.

ADVERTISEMENT

दरवर्षी निकाल जाहीर होण्याच्या आधी एक दिवस बोर्ड अंतिम तारीख जाहीर करतं. यावर्षी SSC 2021 निकाल जाहीर होण्याचा एक दिवस म्हणजे 22 जुलै 2021 रोजीच्या अपडेट जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. हा निकाल जाहीर झाला की अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर तपासता येईल.

शाळांकडून सुरू असलेल्या दहावीच्या निकालांचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. तसंच विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण सिस्टिममध्ये भरण्याचे काम पूर्ण होत आल्याचे बोर्डाकडून सांगण्यात येत आहे. शाळांकडून विद्यार्थ्यांच्या गुणांची माहिती विभागीय मंडळाकडे येणार आहे. ही सगळी माहिती एकत्र करून दहावीच्या परीक्षेचा अंतिम तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्षात शाळा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची माहिती संगणक प्रणालीत भरण्यास वेळ लागत आहे त्यामुळे दहावीचा निकाल जाहीर होण्यास वेळ लागतो आहे असंही सांगितलं गेलं आहे.

हे वाचलं का?

दहावीच्या निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी आपला निकाल अधिकृत पोर्टल mahresult.nic.in वर तपासू शकतात. निकालासंदर्भात अधिक माहिती महाराष्ट्र शिक्षण बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा mahasscboard.in यावर जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या निकालासंदर्भातील माहितीसाठी या वेबसाइटवर लक्ष ठेवून राहावे लागेल.

दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 4 हजार 441 विद्यार्थी उपस्थित होते. करोना पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्याने मूल्यांकन पद्धतीनुसार हा निकाल लागणार आहे. यापैकी साधारण 15 लाख 92 हजार 418 हून अधिक विद्यार्थ्यांचे गुण कॉम्प्युटर सिस्टीममध्ये अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या मूल्यांकन पद्धतीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना नववी आणि दहावीच्या शालांतर्गत झालेल्या परीक्षा आणि असेसमेंटच्या आधारे गुण दिले जाणार आहेत. यातील 50 टक्के वेटेज हे नववीतील गुणांच्या आधारे दिले जाणार आहेत. तर 30 टक्के वेटेज हे इंटरनल असेसमेंट आणि उर्वरीत 20 टक्के वेटेज हे प्रॅक्टीकल आणि होमवर्कच्या असाइनमेंटला दिले जाणार आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT