शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया..

मुंबई तक

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक धडक दिली. यावेळी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आणि त्यांनी पवारांच्या घराबाहेर दगडफेक आणि चप्पलफेक केली. या सगळ्याच प्रकारामुळे आता नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. आंदोलकांनी ज्याप्रकारे सिल्व्हर ओकवर हल्ला चढवला त्यानंतर राज्यभरातून या हल्ल्याविरोधात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक धडक दिली. यावेळी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आणि त्यांनी पवारांच्या घराबाहेर दगडफेक आणि चप्पलफेक केली. या सगळ्याच प्रकारामुळे आता नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. आंदोलकांनी ज्याप्रकारे सिल्व्हर ओकवर हल्ला चढवला त्यानंतर राज्यभरातून या हल्ल्याविरोधात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आता राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या सगळ्या प्रकाराबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी घडल्या प्रकाराबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. ‘ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे.’ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे.

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

‘ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो.’

हे वाचलं का?