Twitter ने भारतातले कायदे आणि नियम ठरवू नये, मोदी सरकारने सुनावलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

WhatsAPP ने केंद्र सरकारविरोधात कोर्टात धाव घेतल्यानंतर आता Twitter आणि मोदी सरकार यांच्यात वाद रंगला आहे. Twitter ने केंद्र सरकारचे डिजिटल नियम आणि ऑफिसमध्ये पोलीस गेल्यामुळे सरकारवर टीका केली. आता सरकारने म्हटलं आहे की Twitter घरातले भारत सरकारचे नियम आणि कायदे ठरवण्याची गरज नाही म्हणत ट्विटरला खडे बोल सुनावले आहे. एवढंच नाही तर ट्विटरने केलेलं वक्तव्य हे दुर्दैवी आणि भारताला बदनाम करणारं आहे असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

एवढंच नाही तर IT मंत्रालयाने ट्विट करत हेदेखील म्हटलं आहे की ट्विटरने केलेला धमकावण्याचा आरोप सपशेल चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. ट्विटरकडून जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशावर आपल्या अटी लादण्याचा प्रयत्न केला जातो आहे. भारतातल्या कायदा सुव्यवस्थेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करू नये. Twitter च नाही तर सोशल मीडियाच्या ज्या कंपन्या भारतात आहे त्यांचे प्रतिनिधी सुरक्षितच राहणार आहेत त्यांना मोदी सरकारकडून कोणताही धोका नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Right to Privacy हा प्रत्येकाचा मौलिक अधिकार, What’s App च्या याचिकेवर केंद्र सरकारचं कोर्टात उत्तर

हे वाचलं का?

काय म्हटलं होतं Twitter ने?

ट्विटरने आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. गुरूवारी ट्विटरकडून हे सांगण्यात आलं की काही दिवसांपूर्वी टूलिकट प्रकरणात ट्विटरच्या कार्यालयावर पोलिसांनी धाड टाकली होती. दिल्ली आणि गुरूग्राम येथील कार्यालयांवर छापे मारण्यात आले होते. या घटनेमुळे आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसाठी चिंतित आहोत.

ADVERTISEMENT

ट्विटरच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे की भारतात आमचे जे कर्मचारी काम करत आहेत त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी केलेली कारवाई आम्हाला चिंतेत टाकणारी आहे. जगभरात ट्विटरचा उपयोग करून काही लोकांनी जे काही ट्विट केले त्यानंतर पोलिसांनी केलेली कारवाई ही आमची काळजी वाढवणारी आहे. 26 मेपासून जे आयटी नियम लागू झाले आहेत त्यांचा हवाला देऊन भारतात लागू करण्यात आलेल्या कायद्यांचं पालन करण्यासंबंधी आम्ही भारत सरकारसोबत चर्चा सुरू ठेवू असंही ट्विटरने म्हटलं आहे. मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरने नवे नियम आणि कायदे पाळण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली आहे.

ADVERTISEMENT

भाजप-काँग्रेसमधलं Toolkit प्रकरण आहे काय? Toolkit म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या..

काय आहे Toolkit प्रकरण ?

Toolkit प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. 18 मे रोजी संबित पात्रा यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये काँग्रेसवर आरोप केले होते. कोरोना संकटादरम्यान एका टूलकिटव्दावरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला धक्का पोहचवण्याचं काम केलं गेलं आहे. काँग्रेसने प्रसिद्धीसाठी आणि चर्चेत राहण्यासाठी काही पत्रकार मित्रांना हाताशी धरून आणि टूलकिटच्या मदतीने वातावरण तापवल्याचा आरोप संबित पात्रा यांनी केला. #CongressToolkitExposed हा हॅशटॅगही ट्रेंड झाला. काँग्रेसचं कौतुक आणि मोदींची बदनामी अशी रणनीती असलेलं हे टूलकिट एक्स्पोज झाल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला. भारतात सापडणाऱ्या कोरोना स्ट्रेनला मोदी स्ट्रेन संबोधलं जावं असं काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना सांगितल्याचाही दावा भाजप नेते संबित पात्रा यांनी केला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी हे टूलकिट हिंदूविरोधी असल्याचं म्हटलं. काँग्रेसने हे सगळे आरोप फेटाळले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT