Nagpur मध्ये अल्पवयीन बलात्कार पीडितेची गळफास घेऊन आत्महत्या
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर नागपुरातील जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत एका बलात्कार पीडित अल्पवयीन युवतीने घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित युवतीला तिचा दूरचा नातेवाईक असलेला आरोपी विकास भुजाडे याने जून महिन्यामध्ये फूस लावून बंगळुरूला पळवून नेलं होतं. या घटनेनंतर पीडित युवतीच्या आईने नागपुरातील जरीपटका पोलिस स्टेशन येथे मुलगी हरवल्याची तक्रार […]
ADVERTISEMENT
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
ADVERTISEMENT
नागपुरातील जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत एका बलात्कार पीडित अल्पवयीन युवतीने घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित युवतीला तिचा दूरचा नातेवाईक असलेला आरोपी विकास भुजाडे याने जून महिन्यामध्ये फूस लावून बंगळुरूला पळवून नेलं होतं.
या घटनेनंतर पीडित युवतीच्या आईने नागपुरातील जरीपटका पोलिस स्टेशन येथे मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी एक महिन्यानंतर जुलै महिन्यात आरोपी आणि पीडित अल्पवयीन युवतीला बंगळुरू येथून नागपुरात आणले होते.
हे वाचलं का?
नागपुरात आल्यानंतर पीडित युवतीने तिच्यासोबत झालेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला त्यानंतर पीडितेच्या कुटुंबांकडून नागपुरातील जरीपटका पोलिस स्थानकामध्ये बलात्काराचा आणि पॉक्सो कायद्यांतर्गत विकास भुजाडे या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या संदर्भातला खटला फास्ट ट्रॅक कोर्टत चालविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बलात्कार पीडित अल्पवयीन युवतीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्येही बलात्काराची घटना घडली. एका महिलेवर अत्यंत पाशवी बलात्कार करण्यात आला. या घटनेचं वर्णन मुंबईची निर्भया असंही करण्यात आलं. साकीनाका भागात या महिलेवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉडही घालण्यात आला. अत्यंत अमानवी आणि क्रूर अशा घटनेत या महिलेला प्रचंड इजा झाली. नराधमाने तिची आतडीही कापली. त्यामुळे प्रचंड प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्या अवस्थेत या महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथे उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या घटनेने मुंबई हादरली होती. आता त्यापाठोपाठ नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
ADVERTISEMENT
6 जूनला मुंबईत धक्कादायक घटना
मुंबईत एक अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली होती. एकाच रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली . या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली. या घटनेने मुंबईत खळबळ उडाली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT