पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी सुखजिंदर रंधावा यांच्या नावाची जोरदार चर्चा, अंतिम निर्णय लवकरच
काँग्रेससमोरील मोठा पेच अखेर निकाली लागला आहे. पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठी सुखजिंदर सिंग रंधावा यांचं नाव निश्चित झालं असून, केवळ काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडून शिक्कामोर्तब होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. महत्त्वाचं म्हणजे पंजाबच्या नव्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू व माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील संघर्षामुळे काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली होती. अखेर […]
ADVERTISEMENT
काँग्रेससमोरील मोठा पेच अखेर निकाली लागला आहे. पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठी सुखजिंदर सिंग रंधावा यांचं नाव निश्चित झालं असून, केवळ काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडून शिक्कामोर्तब होण्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. महत्त्वाचं म्हणजे पंजाबच्या नव्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत.
ADVERTISEMENT
पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू व माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील संघर्षामुळे काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली होती. अखेर या वादात कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं.
सिद्धूने ‘कॅप्टनची’ विकेट काढलीच, कशी आहे लढवय्या अमरिंदर सिंहाची राजकीय कारकीर्द?
हे वाचलं का?
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. यासाठी काही नावांचीही चर्चा सुरू होती. अखेर सुखजिंदर सिंग रंधावा यांच्या नावावर एकमत झालं आहे. सुखजिंदर रंधावा यांच्या नावाचा प्रस्ताव पंजाब काँग्रेसने पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे.
सुखजिंदर सिंग रंधावा यांचं नाव जवळपास निश्चित झालं असून, आता फक्त त्यांच्या नावाच्या घोषणेची औपचारिकता शिल्लक असल्याचं सूत्रांनी ‘आजतक’ला सांगितलं.
ADVERTISEMENT
‘काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मला म्हणाल्या.. I am sorry Amarinder’
ADVERTISEMENT
दरम्यान, पंजाबमधील नव्या सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्रीपदासाठी अरुणा चौधरी भारत भूषण आशू यांची नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन वेगवेगळ्या समाजातील उपमुख्यमंत्री देत काँग्रेस जातीय समीकरण संतुलित करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.
“मी काँग्रेसचा अध्यक्ष असतो, तर कॅप्टन अमरिंदर सिंगांना ३० दिवसातच पक्षातून हाकललं असतं”
सुखजिंदर सिंग रंधावांनी राज्यपालांकडे मागितली वेळ
सुखजिंदर सिंग रंधावा हे पंजाबचे पुढचे मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर महत्त्वाची घडामोड घडली आहे. सुखजिंदर सिंग यांनी पंजाबचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांच्याशी संपर्क केला आहे. राज्यपालांकडे त्यांनी भेटीची वेळ मागितली असल्याची माहिती असून, लवकरच ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं कळते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT