विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सस्पेन्स कायम, बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?
मुंबई: काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अनेक महिने लोटले आहेत. तरीही नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आलेली नाही. आज (22 जून) कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांन दिली आहे. यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबतचा सस्पेन्स अद्यापही […]
ADVERTISEMENT

मुंबई: काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अनेक महिने लोटले आहेत. तरीही नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आलेली नाही. आज (22 जून) कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांन दिली आहे. यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे.
…म्हणून विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडबाबत चर्चा केली नाही!
‘कामकज सल्लागार समितीची बैठक आज पार पडली. त्यामुळे कार्यक्रम पत्रिका येईल तेव्हा आपल्याला नेमका काय कार्यक्रम असेल हे समजेल. आजची बैठक ही कामकाज सल्लागार समितीची होती. त्यामुळे या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा विषय काही चर्चेला येत नाही. हा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे त्याविषयी नेते निर्णय घेऊन आपल्याला कामकाज पत्रिकेच्या माध्यमातून सर्व विषय कळतील.’
‘आमच्यामध्ये कोणताही समन्वयाचा अभाव नाही. त्यामुळे जर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक झाली तर आमचा आकडा आपल्याला दिसेल.’ अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.










