कपिल शर्माने ‘द कश्मीर फाईल्स’चं प्रमोशन करायला नकार दिला?; अनुपम खेर यांनी सांगितलं सत्य
गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन कपिल शर्मा ट्रोल होत आहे. द कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या मुद्द्यावरून लोक कपिल शर्माला ट्रोल करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कपिल शर्मावर चित्रपटाचं प्रमोशन करण्यास बोलवलं गेलं नसल्याचा आरोप केला होता. दरम्यान, द कश्मीर फाईल्स चित्रपटात भूमिका साकारलेल्या अभिनेते अनुपम खेर यांनी या वादावर महत्त्वाचा खुलासा केला आहे. द […]
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून कॉमेडियन कपिल शर्मा ट्रोल होत आहे. द कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या मुद्द्यावरून लोक कपिल शर्माला ट्रोल करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कपिल शर्मावर चित्रपटाचं प्रमोशन करण्यास बोलवलं गेलं नसल्याचा आरोप केला होता. दरम्यान, द कश्मीर फाईल्स चित्रपटात भूमिका साकारलेल्या अभिनेते अनुपम खेर यांनी या वादावर महत्त्वाचा खुलासा केला आहे.
ADVERTISEMENT
द कश्मीर फाईल्स चित्रपटात प्रसिद्ध कलाकार नसल्याचं कारण देत कपिल शर्माने आम्हाला बोलवालं नाही, असं दिग्ददर्शक विवेक अग्निहोत्री यांनी म्हटलं होतं. त्यावरून सोशल मीडियावर बराच गदारोळ सुरू आहे. लोकांकडून कपिल शर्मांला ट्रोल केलं जात असून, द कपिल शर्मा शो वर बहिष्कार टाकण्याचंही आवाहन केलं जात आहे.
नेमकं काय घडलं, अनुपम खेर यांनी सांगितलं सत्य
हे वाचलं का?
अनुपम खेर यांनी द कश्मीर फाईल्स चित्रपटात भूमिका साकारलेली आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. मात्र, द कपिल शर्मा शो मध्ये प्रमोशनसाठी बोलवलं न गेल्यानं वाद उभा राहिला. यावर एका मुलाखतीत बोलताना अनुपम खेर यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे.
‘कपिल शर्मा शो एक कॉमेडी शो आहे. इतक्या गंभीर प्रकरणावर बोलण्यासाठी ते वातारण योग्य आहे आहे असं आपल्याला वाटतं का?’, असा प्रश्न मुलाखतीवेळी अनुपम खेर यांना विचारण्यात आला होता.
ADVERTISEMENT
त्याला उत्तर देताना अनुपम खेर म्हणाले,”प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला शो साठी बोलावणं आलं होतं, पण मी माझ्या मॅनेजरला सांगितलं की, हा चित्रपट खूप गंभीर आहे. मी शो मध्ये जाऊ शकत नाही.”
“येथे मी माझी भूमिका मांडू इच्छितो. ही घटना २ महिन्यांपूर्वीची आहे. मला कार्यक्रमात या, असं बोलावण्यात आलं. मला वाटलं की मी आधीही या कार्यक्रमात गेलेलो आहे आणि एक विनोदी कार्यक्रम आहे. विनोदी कार्यक्रम करणं खूप अवघड असते,” असं अनुपम खेर म्हणाले.
ADVERTISEMENT
अनुपम खेर यांनी स्पष्ट केलं की, कपिल शर्माने मला बोलावलं होतं, पण चित्रपटाचा विषय गंभीर आहे आणि शो कॉमेडी आहे. त्यामुळे मला द कपिल शर्मा शो मध्ये द कश्मीर फाईल्स सारखा गंभीर चित्रपट प्रमोट करणं योग्य वाटलं नाही,” असं खेर म्हणाले.
कपिल शर्मा पुन्हा वादात; विवेक अग्निहोत्रीच्या आरोपानंतर चाहते भडकले
अनुपम खेर यांनी मुलाखतीत वस्तुस्थिती स्पष्ट केल्यानंतर कपिल शर्माने अनुपम खेर यांचे आभार मानले आहेत. कपिल शर्माने मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत अनुपम खेर यांचे आभार मानले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT