आता उन्हाळ्याच्या सुट्टीतही सुरू राहणार ऑनलाइन शाळा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापूर: विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी यासाठी शिक्षण विभागा आता उन्हाळी सुट्टी कमी करून उन्हाळ्यात दोन तासांचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

मागील वर्षभर कोरोनामुळे शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद नवीन योजना आणण्याच्या तयारीत आहे.

दरवर्षी शिक्षकांना 5 मे ते 13 जून या काळात उन्हाळी सुट्टी दिली जाते. मात्र कोरोनामुळे बहुतांश दिवस शाळा बंदच ठेवाव्या लागल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून मे महिन्यात दोन तासांची शाळा भरविली जाणार असून यंदा शिक्षकांना 15 दिवसांचीच उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे.

हे वाचलं का?

या काळातही शिक्षकांना घरबसल्या ऑनलाइन वर्ग घ्यावे लागणार असून त्यादृष्टीने वेळापत्रक तयार केले आहे. लवकरच ते जाहीर केले जाईल अशी माहिती शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी दिली.

महाराष्ट्रातला पहिला कोरोना रुग्ण बरा होऊन घरी गेला तेव्हा..

ADVERTISEMENT

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ लक्षात घेता अनेक जिल्ह्यात शाळा गेल्या वर्षभरापासून बंदच आहेत. तसंच ऑनलाइन वर्ग देखील बऱ्याच उशिराने सुरु झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं खूपच शैक्षणिक नुकसान झालं आहे. त्यामुळेच आता सोलापूरच्या शिक्षणधिकाऱ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत देखील ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश दिले आहेत.

ADVERTISEMENT

राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 9927 जणांना Corona ची लागण

राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 9927 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 24 तासात दहा हजारांच्या जवळपास रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. राज्यात मागील काही दिवसापासून दररोज 10 हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. ज्यामुळे आरोग्य सेवेवरील ताण सातत्याने वाढत आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे मागील गेल्या 24 तासात राज्यात 12,182 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

काल (9 मार्च) दिवसभरात कोरोनाचे 56 रुग्ण दगावले असल्याची माहिती देखील मिळते आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोना मृतांचा आकडा हा 52556 एवढा झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.35 टक्के एवढा आहे. तर राज्यात आताच्या घडीला 95,332 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT