चोराच्या उलट्या बोंबा; मुद्देमाल न सापडल्यामुळे चिठ्ठी लिहून ठेवत घरमालकाला म्हणाला भिकारी
– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी आतापर्यंत चोरीचे अनेक अतरंगी प्रकार तुम्ही बातम्यांमध्ये वाचले असतील. नागपूरमध्ये पोलिसांना चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीचा प्रत्यय आला आहे. हुडकेश्वर भागात एका घरात चोरीसाठी शिरलेल्या चोरट्याला काहीही हातात न लागल्यामुळे त्याने निराश होऊन चिठ्ठी लिहून ठेवत घरमालकाला भिकारी म्हटलं आहे. इतकच नव्हे तर तुमच्या घरातून काहीही चोरलं नसल्याचंही या चोराने […]
ADVERTISEMENT
– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी
ADVERTISEMENT
आतापर्यंत चोरीचे अनेक अतरंगी प्रकार तुम्ही बातम्यांमध्ये वाचले असतील. नागपूरमध्ये पोलिसांना चोराच्या उलट्या बोंबा या म्हणीचा प्रत्यय आला आहे. हुडकेश्वर भागात एका घरात चोरीसाठी शिरलेल्या चोरट्याला काहीही हातात न लागल्यामुळे त्याने निराश होऊन चिठ्ठी लिहून ठेवत घरमालकाला भिकारी म्हटलं आहे. इतकच नव्हे तर तुमच्या घरातून काहीही चोरलं नसल्याचंही या चोराने लिहून ठेवलं आहे.
नागपूर पोलिसांनी या अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हुडकेश्वर भागात एका चोरट्याने कुलूप बंद घरात चोरीचा करण्याचा बेत आखला होता. २० फेब्रुवारीच्या मध्यरात्री या चोराने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. परंतू यावेळी घरात तीन हजार रुपयांच्या व्यतिरिक्त काहीच हातात न लागल्याने चिडलेल्या चोराने एका कागदावर “मी काहीही चोरलेले नाही, भिकारी” असं लिहून आपला संताप व्यक्त करत पळ काढला.
हे वाचलं का?
स्वयंपाकाला उशीर झाला म्हणून पत्नीला जिवंत जाळलं, उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू
२३ फेब्रुवारीच्या रात्री संबंधित कुटुंब पंढरपूर वरून परतले. यावेळी त्यांना घराचा मुख्य दरवाजा तोडलेला दिसला. घरातल्या सर्व वस्तू विखुरलेल्या आढळल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचं लक्षा आलं. यानंतर कुटुंबाने चोरट्यांनी घरातून काय चोरून नेले आहे याचा अंदाज घेतला असता घरातल्या कपाटात ठेवलेले ३ हजार रुपये नेल्याचं लक्षात आले.
ADVERTISEMENT
‘ती’ हत्या घरगुती वादातून नाही! बायको आणि मुलीचं प्रेमप्रकरण समजल्यामुळे वडिलांनी गमावला जीव
ADVERTISEMENT
याच शोधमोहीमेत घरच्यांना चोराने लिहून ठेवलेली ही चिठ्ठी सापडली. २४ फेब्रुवारीला हुडकेश्वर पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.
फ्लोअर मिलच्या पट्ट्यात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू, साफसफाई करणं बेतलं जिवावर
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT