एकाच महिलेला दिले कोरोना प्रतिबंधक लसीचे तीन डोस, कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विक्रांत चव्हाण, ठाणे

ADVERTISEMENT

एकीकडे पालकमंत्र्यांकडून ठाणे (Thane) पालिकेच्या लसीकरण (Vaccination) मोहिमेचे कौतुक केले जात असताना दुसरीकडे लसीकरण केंद्रांवरील गलथानपणा उघडकीस आला आहे. कोव्हिड प्रतिबंधक लस घेण्यासाठी आलेल्या एका 28 वर्षीय महिलेला एकाच केंद्रावर चक्क लसीचे तीन डोस (Vaccine) देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

तूर्तास या महिलेची प्रकृती स्थिर असली तरी तिला वैद्यकीय अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दरम्यान, असा निष्काळजीपणा करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

हे वाचलं का?

ठाण्यातील घोडबंदर रोड येथे असलेल्या आनंदनगर आरोग्य केंद्रावर 25 जून रोजीच्या दुपारच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला असल्याचं समोर आलं होतं.

कोव्हिड प्रतिबंधक लस घेण्यासाठी ब्रम्हांड येथे राहणारी एक महिला या आरोग्य केंद्रावर गेली होती. या वेळी केंद्रावर उपस्थित असणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांनी या महिलेला तब्बल एक नव्हे तर तीनवेळा लस दिली. एकाच वेळी तीन डोस दिल्याने ही महिला घाबरली आणि घरी आली.

ADVERTISEMENT

आपल्यासोबत झालेला संपूर्ण प्रकार तिने आपल्या पतीला सांगितला. तर, याचवेळी पालिका अधिकार्‍यांनी मात्र असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

लस घेण्यासाठी अभिनेत्री झाली कोविड सेंटरची सुपरवायजर, ठाण्यातील धक्कादायक प्रकार उघड

या वेळी उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे पालिकेचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, चौकशी करून संबंधितावर कारवाई केली जाईल. अशी प्रतिक्रिया ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

लस घेण्यासाठी कोविड सेंटरमध्ये सुपरवाजयर : अभिनेत्री मीरा चोप्राने आरोप फेटाळले

लस घेण्यासाठी अभिनेत्री झाली कोव्हिड सेंटरची सुपरवायजर

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एक अभिनेत्री लस मिळविण्यासाठी थेट कोव्हिड सेंटरची सुपरवायजर झाली असल्याचं समोर आलं होतं. हा प्रकार देखील ठाण्यातच घडला होता.

मीरा चोप्रा ही तामिळ, तेलगू सिनेसृष्टीत काम करते. मीरा चोप्राने ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाजा येथील कोव्हिड सेंटरमध्ये सुपरवायजर म्हणून काम करत असल्याचं भासवत लस घेतली होती. महत्वाची गोष्ट म्हणजे मीराने आपण लस घेतानाचा फोटो ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत सर्वांना लस घेण्याचं आवाहनही केलं होतं. परंतु ही बाब प्रसारमाध्यमांमध्ये समोर येताच तिने ही पोस्ट डिलीट केली होती.

दरम्यान, या प्रकरणावरुन ठाणे शहरातलं राजकारण बरंच तापलं होतं. अभिनेत्रीला कोव्हिड सेंटरमध्ये सुपरवायजरचं ओळखपत्र कोणी बनवून दिलं होतं? कोणत्या कारणासाठी दिलं याचा तपास व्हायला हवा अशी मागणी ठाणे मनपाचे भाजप गटनेते मनोहर डुंबरे यांनी केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT