धुळे : कांद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, ड्रायव्हर जखमी…लोकांनी मात्र संधी साधून कांदे पळवले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

संकटकाळात अनेकदा माणूस माणसाच्या मदतीला धावून जातो. परंतू काहीवेळा याच्या एकदम उलटं चित्र पहायला मिळतं. धुळ्याच्या शिरपूरजवळ सावळदे फाटा भागात सोमवारी सकाळी एका कांद्याच्या ट्रकचा अपघात झाला. तापी नदी ओलांडल्यानंतर ट्रकचा टायर फुटल्यामुळे अनर्थ टळला. परंतू ट्रकमधला कांदा बाहेर पडल्यानंतर या परिसरातील लोकांनी अपघातग्रस्त ड्रायव्हरला मदत करायची सोडून कांदे पळवण्यात धन्यता मानली.

ADVERTISEMENT

या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही, परंतू ट्रक चालक आणि त्याच्यासोबत असलेल्या वाहकाला गंभीर दुखापत झाली. कालांतराने या जखमींना नंतर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तोपर्यंत कांद्याचा ट्रक पलटी झाल्याची बातमी गावात पसरली आणि संपूर्ण गाव या भागात गोळा झाला आणि मिळेल त्या साधनाने त्यांनी कांदा पळवला.

धुळे : कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णाच्या खिशातले पैसे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी लांबवले

हे वाचलं का?

अनेकांनी या ट्रकमधला कांदा आपल्या वाहनांवरुन नेला. काही लोकांनी या दुर्घटनेत फक्त कांदा नाही तर अपघातग्रस्त ट्रकमधली ताडपत्री, दोरखंडही पळवून नेलं. त्यामुळे संकटातही संधी साधल्याचं एक विचीत्र उदाहरण आज धुळ्यात पहायला मिळालं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT